लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ओव्हरलोड तथा चोरटी रेती वाहतूक करणाऱ्या पाच ट्रकांचा पाठलाग करून तहसीलदारांनी सिनेस्टाईल कारवाई केली. खापा - खरबी शिवारात ही धडक कारवाई आज चर्चेचा विषय झाला. मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सदर ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले आहे.तुमसर तालुक्यातील सीतेपार येथून अवैध ओव्हरलोड रेतीचे पाच ट्रक खापाच्या दिशेने निघाले. याची माहिती तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांना मिळाली. त्यांनी ताफ्यासह खापा चौक गाठले. सदर भरधाव ट्रक खापावरून खरबीच्या दिशेने जात असताना तहसीलदारांनी वाहनांचा ताफा ट्रकमागे लावला. खरबी शिवारात पाचही ट्रकला गाठून रेती वाहतुकीचे कागदपत्रांची पाहणी केली.सदर ट्रक चालकाजवळ रॉयल्टीचे दस्ताऐवज आढळले नाही. पाचही ट्रक तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.यात ट्रक क्रमांक एमएच ४० बीजी ६०३५, एमएच ४० बीजी २४८१, एमएच ४० एके ५६२५, एमएए ४० बीजी ३५७८, एमएच ४९ एटी १२९६ यांचा समावेश आहे.ट्रकमधील रेतीचे वजन तथा रॉयल्टी न आढळल्याने नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांनी दिली.तुमसर तालुक्यात १३ रेती घाट असून त्यातून सर्रास रेतीचे उत्खनन सुरु आहे. मागील पाच वर्षात कोट्यवधींचा महसूल बुडाला आहे. नदीपात्र पोखरले गेले आहे. तालुका महसूल प्रशासनाने येथे मोठी कारवाई न केल्याने त्यांचे फावले होते. आचारसंहिता घोषीत होताच महसूल प्रशासनाने मंगळवारी मोठी कारवाई केली. पुन्हा धडक कारवाई महसूल प्रशासन करणार असल्याचे समजते.आकारणार लाखोंचा दंडनवीन नियमानुसार लाखोंचा दंड येथे आकारण्यात येणार अशी माहिती आहे. त्यामुळे रेती चोरट्यांचे धाबे दणाणले आहे. तुमसर तालुक्यातील रेती घाटांवर महसूल प्रशासनाची करडी नजर राहणार असल्याचे समजते. तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांनी दुपारच्या सुमारास सुकळी (दे) येथील नदीघाटावर भेट दिल्याचे समजते.खापा - खरबी शिवारात ओव्हरलोड व विना रॉयल्टीचे पाच ट्रक ताब्यात घेण्यात आले. महसूल अधिनियम अंतर्गत त्यांच्यावर दंड आकारून रितसर कारवाई करण्यात येणार आहे.- गजेंद्र बालपांडे,तहसीलदार तुमसर
तुमसरमध्ये रेतीचे पाच ट्रक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 6:00 AM
तुमसर तालुक्यातील सीतेपार येथून अवैध ओव्हरलोड रेतीचे पाच ट्रक खापाच्या दिशेने निघाले. याची माहिती तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांना मिळाली. त्यांनी ताफ्यासह खापा चौक गाठले. सदर भरधाव ट्रक खापावरून खरबीच्या दिशेने जात असताना तहसीलदारांनी वाहनांचा ताफा ट्रकमागे लावला.
ठळक मुद्देतहसीलदारांनी केला सिनेस्टाईल पाठलाग : रेती तस्करांचे धाबे दणाणले