शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
3
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
5
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
6
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची पोस्ट, म्हणाला- ED लागेल की बडतर्फी होईल?
7
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
8
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
9
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
10
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
11
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
12
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
13
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
14
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
15
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
16
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
17
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
18
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
19
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?

तुमसर, साकोली तालुक्यातील पाच गावे दुष्काळग्रस्त घोषित

By admin | Published: April 12, 2017 12:46 AM

जिल्ह्यातील खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५० पैसे व त्यापेक्षा कमी आलेल्या तुमसर व साकोली तालुक्यातील पाच गावांमध्ये ...

आठ सवलती लागू : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशभंडारा : जिल्ह्यातील खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५० पैसे व त्यापेक्षा कमी आलेल्या तुमसर व साकोली तालुक्यातील पाच गावांमध्ये जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी १० फेब्रुवारीच्या शासन निणर्यानुसार दुष्काळसदृष्य परिस्थिती घोषित केली. यामुळे या गावांमध्ये आठ प्रकारच्या सवलती लागु करण्यात आल्या आहेत. या गावांमध्ये जमीन महसुलात सुट, कृषी पंपाच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सवलत, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहिर केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे, रोहयोंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, सहकारी कर्जाचे पुनर्गठण अशा आठ सवलती या गावांना लागु करण्यात आले आहे.दुष्काळ सदृष्य गावातील पीक नुकसानीमुळे बाधीत शेतकऱ्यांना मदत देताना ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पिक विमा काढलेला आहे, अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत मंडळनिहाय भरपाईची रक्कम देण्यात येईल. याशिवाय प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांना ५० टक्के मदत देण्यात येणार आहे. जिल्ह्यात तुमसर तालुक्यातील चुल्हरडोह, आग्री, चिचोली व भोंडकी आणि साकोली तालुक्यातील नवेगाव (रिठी) या गावांचा दुष्काळ सदृष्य गावांमध्ये समावेश आहे. (प्रतिनिधी)