लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : येथील प्राथमिक आरोग्य सडक-अर्जुनी तालुक्यात येत. या आरोग्य केंद्रात फ्लोरिंग आणि टाईल्सचे बांधकाम सुरु असून हे बांधकाम निकृष्ट दर्जा केले जात असल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राचे सध्या सुरू असलेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले जात असून याकडे जि.प.प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. कंत्राटदाराच्या बेजबाबदार पणामुळे हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचा आरोप आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकृष्ट बांधकामाची तक्रार गावकºयांनी संबंधित विभागाकडे केली. मात्र त्यांच्याकडून उडावाउडवीची उत्तरे देऊन दुर्लक्ष करण्यात आले.सन २०१६-१७ या वर्षातील कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. सदर बांधकाम ३ लाख रुपयांचे आहे. मात्र यात सिमेंटचा वापर कमी प्रमाणात केला जात आहे. याची दखल व चौकशी करण्याची मागणी उपकार्यकारी अभियंता व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे केली आहे. गावकºयांनी तक्रार केल्यानंतर जि.प.बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करित असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.इमारत बांधकाम आणि दुरूस्तीसाठी ३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती आहे. परिसरातील गावकºयांना आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम केले जात आहे. ते दर्जेदार करण्यात यावे.यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.जात वैधता प्रमाणपत्र सादर करागोंदिया : शैक्षणकि सत्र २०१७-१८ मध्ये इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी तसेच संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी इयत्ता १२ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्राचे अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गोंदिया कार्यालयाकडे सादर करण्याची अंतिम तारीख ३१ आॅक्टोबर २०१७ निर्धारित केली आहे.
फ्लोरिंग, टाईल्सचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 9:20 PM
येथील प्राथमिक आरोग्य सडक-अर्जुनी तालुक्यात येत. या आरोग्य केंद्रात फ्लोरिंग आणि टाईल्सचे बांधकाम सुरु असून हे बांधकाम निकृष्ट दर्जा केले जात असल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे.
ठळक मुद्देप्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार : चौकशी करण्याची गावकºयांची मागणी