लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी उड्डाणपुलात फ्लाय अॅश भरावाचे काम सुरु आहेत. सदर फ्लाय अॅशवर पाण्याचा मारा करण्यात येतो. पाण्यासह ती वाहून संरक्षित दगडातून पुन्हा रस्त्यावर पसरते आहे. टँकरने पाणी फ्लाय अॅशवर घातली तरी ती वाहून रस्त्यावर येत आहे. पावसाळ्यात ती मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पसरण्याचा धोका वाढला आहे.देव्हाडी येथे रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भराव घालून उड्डाणपुलाचे कामे सुरु आहेत. पुल भरावात रासायनिक फ्लाय अॅश भरण्यात येत आहे. उड्डाणपुल अॅप्रोच मार्ग दोन्ही बाजूला सीमेंट दगडाचा संरक्षण म्हणून उपयोग करण्यात आला आहे. सीमेंट दगडातील पोकळीतून फ्लाय अॅश पाण्यासह वाहून पुन्हा पोचमार्गावर पसरणे सुरु झाले आहे.दोन्ही बाजूचे पोचमार्ग डामरीकरण येथे करण्यात आले. उड्डाणपुल भरावाची कामे अंतिम टप्प्यात आहे. फ्लाय अॅश भरावात घातल्यानंतर ती हवेत उडू नये व ती जमा व्हावी याकरिता त्यावर पाणी शिंपडले जाते. त्या पाण्यासह फ्लाय अॅश वाहून रस्त्यावर येत आहे. पावसाळ्यातही फ्लाय अॅश सर्वत्र पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. वाहतुकीदरम्यान सदर फ्लाय अॅश हवेत प्रचंड प्रमाणात उडते. ती डोळ्यात व नाकातोंडात गेल्यावर आजाराची शक्यता अधिक आहे. अदानी वीज कारखान्यातील सदर फ्लाय अॅश रासायनिक आहे. मानवी शरीरावर तिचा विपरीतपरिणाम होतो. प्रचंड धुळीमुळे समोरची वाहने यापूर्वी येथे दिसत नव्हती. संबंधित विभागाने सीमेंट दगडातून फ्लाय अॅश वाहून जाऊ नये याकरिता उपाययोजना करण्याची गरज आहे.
उड्डाणपुलाची फ्लाय अॅश पुन्हा रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 1:19 AM
देव्हाडी उड्डाणपुलात फ्लाय अॅश भरावाचे काम सुरु आहेत. सदर फ्लाय अॅशवर पाण्याचा मारा करण्यात येतो. पाण्यासह ती वाहून संरक्षित दगडातून पुन्हा रस्त्यावर पसरते आहे. टँकरने पाणी फ्लाय अॅशवर घातली तरी ती वाहून रस्त्यावर येत आहे.
ठळक मुद्देदेव्हाडी येथील प्रकार : बंदोबस्ताची गरज