आॅनलाईन लोकमतभंडारा : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता व बंधूता हे विचार आपल्याला दिले आहेत. या विचाराचा अंगिकार केल्यास खऱ्या अर्थाने मानव जातीचा विकास होईल. डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांचे विचाराचे अनुसरण केल्यास त्यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केले.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, भंडाराच्या वतीने आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते.बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिसर, त्रिमूर्ती चौक, भंडारा येथे ही अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी समितीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खासदार नाना पटोले यांनी बाबासाहेबांना अभिवादन करून माल्यार्पण केले.याप्रसंगी बोलताना नाना पटोले म्हणाले, बाबासाहेबांनी विचारांची लढाई लढली आणि त्यांच्या विचारांचा विजय झाला. त्यांचे विचार जपावे, असा मुलमंत्र उराशी बाळगण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. उपस्थितांनीही मनोगत व्यक्त केले.बाबासाहेब आंबेडकर यांनी सदैव ग्रंथाचे व पुस्तकांचे महत्व विषद केले आहे. भंडारा जिल्ह्यात मोठे वाचनालय नाही.शासनाच्या निधीमधून भंडारा येथे भव्य व सुसज्ज वाचनालय उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 12:11 AM
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता व बंधूता हे विचार आपल्याला दिले आहेत. या विचाराचा अंगिकार केल्यास खऱ्या अर्थाने मानव जातीचा विकास होईल.
ठळक मुद्देनाना पटोले : त्रिमूर्ती चौकात बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन