शहरं
Join us  
Trending Stories
1
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
2
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
3
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
4
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
5
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
6
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
7
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
8
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
9
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
10
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
11
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
12
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
13
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
14
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
15
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
16
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
17
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
18
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
19
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
20
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे उपोषण मागे

By admin | Published: August 21, 2016 12:23 AM

गत पाच दिवसांपासून १६ तास भारनियमनाच्या विरोधात वीज वितरण कार्यालयासमोर सुरू असलेले ...

आता १२ तासांचे भारनियमन : खासदार, आमदारांची उपोषण मंडपाला भेटसाकोली : गत पाच दिवसांपासून १६ तास भारनियमनाच्या विरोधात वीज वितरण कार्यालयासमोर सुरू असलेले शेतकऱ्यांच्या उपोषण मंडपाला खासदार नाना पटोले व आमदार राजेश काशीवार यांनी भेट देवून उद्यापासून १२ तासांचे भारनियमन करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.दरम्यान आज शेतकऱ्यांनी शासनाच्या व भारनियमनाच्या विरोधात नारेबाजी करीत साकोली व सेंदुरवाफा या गावातून शासनाची अंत्ययात्रा मोर्चा काढला. यावेळी सुनिल फुंडे यांनी निवडणुकीपुर्वी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन सत्ता काबीज करणाऱ्या भाजप सरकारला आता शेतकऱ्याची परिस्थिती दिसत नाही. १६ तासाचे भारनियमन करून शेतकऱ्यांना संपवण्याचा भाजपाचे हे कटकारस्थान आहे. मागील दोन महिन्यापासून शेतकरी भारनियमन बंद व्हावे यासाठी धावपळ करीत आहेत. विज वितरण कार्यालयासमोर १६ पासून १६ तासाचे भारनियमन बंद करण्यात यावे, यासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू आंदोलनात अविनाश ब्राम्हणकर, अंताराम खोटेले, राम महाजन, हरीभाऊ खोटेले, रामचंद्र कापगते, दुर्वास कापगते, सुरेशसिंह बघेल, गोवर्धन कापगते, रामदास कापगते, बाबुराव कापगते, प्रकाश शिवणकर, अभिमन चुटे, यशवंत ब्राम्हणकर, मारोती कापगते हे शेतकरी पाचव्या दिवशीही आमरण उपोषणाला बसले होते. आज अंत्ययात्रा मोर्चा निघणार म्हणून तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने साकोली येथील उपोषणस्थळी पोहचले व दुपारी १२ वाजेदरम्यान वाज्या गाज्यासह अंत्ययात्रा मोर्च्याला सुरवात झाली. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. या मोर्च्यात आंदोलनकर्ते शेतकऱ्यासह मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, प्रदीप मासूरकर, हेमकृष्ण वाडीभस्मे, रामू लांजेवार, अशोक कापगते, नरेंद्र वाडीभस्मे, प्रविण भांडारकर, नंदू समरीत, अश्विन नशीने, रामचंद्र कोहळे, डॉ. अजय तुमसरे, नरेश करंजेकर, छाया पटले यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते. मोर्च्यानंतर खासदार, आमदारांनी उपोषण मंडपाला भेट देवून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर उपोषणाची रितसर सांगता करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)