देवानंद नंदेश्वर / इंद्रपाल कटकवार।आॅनलाईन लोकमतभंडारा : कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा मैदान येथे पाच दिवसीय वैनगंगा कृषी महोत्सव सुरु आहे. महोत्सवाच्या दिमाखदार आयोजनासाठी कृषी विभागाने कुठलीही कसर सोडली नाही. महोत्सव स्थळी खाद्य पदार्थ आणि सौंदर्य प्रसाधनाचेच स्टॉल अधिक दिसून आले. त्यामुळे हा खाद्य की कृषी महोत्सव हे समजण्यास मार्ग नाही.जिल्ह्यातील शेतकरी मागील दोन तीन वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. हवामान बदलाचा शेतीवर झपाट्याने परिणाम होत आहे. त्यामुळे पिकांचा पॅटर्न बदलण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. एकंदरीत या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी गोंधळाच्या स्थितीत असून त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. त्यासाठीच जिल्हा कृषी विभागाने कृषी महोत्सवाचे आयोजन केले असावे. असा समज जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिक आणि शेतकºयांचा आहे. कृषी विभागाने पाच दिवसीय कृषी महोत्सवावर लाखोंच्या खर्चाचे नियोजन केले. येथील दसरा मैदानाच्या भव्य पटागंणावर पाच ते सहा मोठे डोम उभारण्यात आले. वैनगंगा कृषी महोत्सवासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. ज्या शेतकºयांसाठी हा महोत्सव आयोजित केला आहे त्या शेतकºयांची या महोत्सवात अत्यल्प हजेरी दिसून आली. त्यामुळे नेमका हा महोत्सव शेतकºयांचा की केवळ कृषी विभागाचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.महोत्सवस्थळी शेतकºयांना कृषी विषयक मार्गदर्शन करण्यासाठी मोठे डोमे व मंच उभारण्यात आले होते. मात्र यात काही मार्गदर्शक वगळता तज्ज्ञ मार्गदर्शकांचा अभाव होता. डोममध्ये शेतकºयांपेक्षा रिकाम्या खुर्च्यांची संख्या अधीक होती.कृषी विभागाचे अधिकारी वगळता या डोममध्ये बहुतांश शेतकरी भटकलेच नाही. महोत्सवस्थळी गर्दी भासविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी आणि त्यांचे अधिनस्त कर्मचारी स्टॉल बाहेर व डोममध्ये खुर्च्यांवर बसून होते. त्यामुळे हा कृषी महोत्सव नेमका शेतकºयांसाठीच होता की कृषी विभागासाठी असा प्रश्न निर्माण होतो. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकºयांपर्यंत पोहचविण्यासाठी म्हणून हे कृषी महोत्सव आयोजित केल्याचे या विभागाचे अधिकारी सांगतात. मात्र पाच दिवसीय महोत्सवात शेतकरी अभावानेच आढळला. त्यामुळे कृषी विभागाने नेमके या महोत्सवाने काय साधले असा सवाल उपस्थित होत आहे.शहरात जनजागृतीजिल्ह्यात दोन लाखावर शेतकरी आहेत. ग्रामीण भागातच शेतकरी मोठ्या प्रमाणात राहतात. मात्र कृषी विभागाने कृषी महोत्सवाची जनजागृती शहरात अधिक केली तर ग्रामीण भागात माहितीच पोहचली नाही. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना महोत्सवाची माहिती वर्तमान पत्रात बातम्या आल्यानंतरच मिळाली. शेतकरी ग्रामीण भागात अन्् जनजागृती शहरात असेच चित्र होते.कृषी विभागाने कृषी महोत्सवाचे आयोजन शहराच्या टोकावर असलेल्या दसरा मैदानात ठेवले. त्यामुळे बसने कृषी महोत्सवासाठी येणाऱ्या शेतकऱ्याना या स्थळापर्यत पोहचण्यासाठी आॅटो करून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यानी महोत्सवस्थळी न जाणे पसंत केले.
खाद्य की कृषी महोत्सव?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:38 PM
कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा मैदान येथे पाच दिवसीय वैनगंगा कृषी महोत्सव सुरु आहे.
ठळक मुद्देमहोत्सवाचा आज समारोप : शेतकऱ्यांपेक्षा रिकाम्या खुर्च्यांची संख्या अधिक