शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

बनावट दारु कारखान्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 10:53 PM

नामवंत मद्यनिर्मिती कंपन्यांची नक्कल करुन बनावट दारु निर्मिती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारला धाड टाकली. यावेळी विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, बनावट झाकण, लेबल आदी आढळून आले. पोलिसांनी पाच जणांना याप्रकरणी अटक केली आहे.

ठळक मुद्देपाच जणांना अटक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नामवंत मद्यनिर्मिती कंपन्यांची नक्कल करुन बनावट दारु निर्मिती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारला धाड टाकली. यावेळी विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, बनावट झाकण, लेबल आदी आढळून आले. पोलिसांनी पाच जणांना याप्रकरणी अटक केली आहे.प्रशांत दुर्गाप्रसाद मानवटकर (२८), चेतन चकोले (२८), गोपाल ठाकूर (३२), गोलू गोस्वामी (२४) व कैलास मोहरकर (३०) सर्व रा. भंडारा असे बनावट दारु निर्मिती करणाऱ्यांची नावे आहेत.सणांच्या निमित्ताने मौजा कारधा परिसरात अनेक दिवसांपासून बनावट दारुची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यानुसार गुरूवारला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने चार चाकी वाहनांची झडती घेतली.या दरम्यान सदर पाच इसम बनावट विदेशी मद्य तयार करून वाहतूक करताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून चारचाकी, दुचाकी, बनावट बाटल्या व दारूसाठी लागणारे साहित्य आढळून आले. याची किंमत तीन लाख ३० हजार रूपये असल्याचे सांगण्यात येते.यावेळी विक्रीसाठी तयार केलेल्या मध्यप्रदेश राज्यात निर्मित व तेथेच विक्रीला असलेल्या सिल्व्हर झेड विस्की तसेच त्यापासून महाराष्टÑातील नामांकित ब्रॉण्डच्या विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, बनावट झाकण, लेबल असा तीन लाख २९ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. त्याच्या विरुध्द महाराष्टÑ दारुबंदी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभाग याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त अश्विनी जोशी, संचालक सुनिल चव्हाण, उपायुक्त उषा शर्मा, भंडाराचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत निरीक्षक तानाजी कदम, दुय्यम निरीक्षक पांडूरंग घरटे, सुष्मा कुंभारे, रोहिनी बनकर, सहायक दुय्यम निरीक्षक अरविंद कोटांगले, नरेश उईनवार, जे.ए. अंबुले, संजय कोवे, हेमंत कांबळे, जयघोष जनबंधू, स्वप्नील लांबट, विनायक हरिणखेडे, नरेंद्र कांबळे, सविता गिरीपुंजे, मंगेश ढेंगे, विष्णू नागरे आदी उपस्थित होते.जिल्ह्यात बनावट दारुचा शिरकावगावठी दारु पाठोपाठ आता जिल्ह्यात बनावट दारुनेही शिरकाव केल्याचे दिसून येत आहे. नामवंत कंपन्यांच्या ब्रॅण्डची नक्कल करुन ही दारु विकली जाते. दिसायला हुबेहुब असल्याने अट्टल दारु पिणाºयांनाही ही बाब लक्षात येत नाही. परंतु या बनावट दारुमधील विषारी घटकांचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही एक कारवाई केली असली तरी जिल्ह्यात असे अनेक कारखाने असण्याची शक्यता आहे.