मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पर्यावरण व निसर्गाचे संतुलन राखून साता समुद्रापलीकडून येणारे पाहुणे पक्षी तुमसर तालुक्यात सुरक्षित नाही. दिसायला मिनी सारस असणारे तुरा (ग्रामीण भाषेत) पक्षी सध्या सिंदपुरी येथील गाव तलावावर वास्तव्याला आले आहेत. उंच देखण्या पक्षांचा वावर आकर्षण ठरले आहे. या पाहुण्या पक्ष्यांची शिकार केली जात असल्याची माहिती पुढे आली आहे.तुमसरपासून १५ कि.मी. अंतरावर सिंदपुरी गाव आहे. गावाबाहेर एक जुने १०० हेक्टर परिसरात मोठे तलाव आहे. तलाव मोठे असून तलावात बाराही महिने जलसाठा उपलब्ध असतो. शेतीच्या सिंचनासाठी परिसरातील शेतकºयांना पाणी प्राप्त होते. एकांतस्थळी तलाव असल्याने येथे हजारो पक्षांचा वावर असतो. चहूबाजूंनी शेती आहे. भारतीय पक्षांसोबतच मागील काही वर्षापासून येथे परदेशी पक्ष्यांचे आवागमन वाढले आहे. २५० ते ३०० परदेशी पाहुणे पक्षी सध्या येथे पाहावयास मिळत आहेत.आॅगस्ट ते सप्टेंबर महिन्यात ते सायबेरिया तथा आफ्रिका देशातून ते आल्याचे समजते. जानेवारीच्या शेवटपर्यंत ते येथे राहतात. फेब्रुवारी महिन्यात ते स्वदेशात निघून जातात. ग्रामीण भाषेत या परदेशी पाहुण्यांना तुरा असे म्हणतात. अतिशय उंच हे पक्षी असून फ्लेमिंगो किंवा मिनी सारस सारखी यांची शरीरयष्टी दिसते. पांढरा रंग गळ्याभोवती काकळे पट्टे व लालसर व उंच पाय असे ते दिसतात. सहसा शांत व जवळ गेल्यावरही ते तात्काळ दूर जात नाहीत. मान लांब व हळू आवाज ते काढतात.थव्याने ते एकत्र तलावाच्या मध्यभागी ते सहजा दिसतात. बारीक मासोळ्या त्यांचे मुख्य खाद्य आहे. विदेशी पाहुण्या पक्ष्यांची या तलावावर शिकार करणे सुरु असल्याची माहिती आहे. या पक्ष्यांचे किमान वजन दोन ते तीन किलोग्रॅम इतके आहे. सकाळी अथवा सायंकाळी शिकारी शिकार करतात अशी माहिती आहे. याबाबत तुमसर वन विभाग मात्र अनभिज्ञ आहे. येथे पक्षांचा जीव धोक्यात आहे. या प्रकरणी तुमसर वनपरिक्षेत्राधिकारी अरविंद जोशी यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.विदेशी तथा स्वदेशी पक्ष्यांची शिकार रोखणे गरजेचे आहे. वनविभागाने त्याकरिता रेस्क्यु आॅपरेशन राबविणे आवश्यक आहे. पर्यावरणाच्या संतुलनाकरिता वन विभगाने उपाययोजना करावी.-बबलू कटरे, सरपंच मोहगाव (खदान)विदेशी पक्षी सुरक्षित नाही. शिकारीच्या घटनेकडे वन विभाग सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. याबाबतीत राज्याच्या वनमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येईल.-हिरालाल नागपुरे, गटनेते, पंचायत समिती, तुमसर.
सिंदपुरी तलावावर विदेशी पक्ष्यांची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 9:15 PM
पर्यावरण व निसर्गाचे संतुलन राखून साता समुद्रापलीकडून येणारे पाहुणे पक्षी तुमसर तालुक्यात सुरक्षित नाही.
ठळक मुद्देसायबेरिया व आफ्रिका देशातील पक्षी : मिनी सारस म्हणून ओळख, वनविभागाचे दुर्लक्ष