संजय साठवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तलावाच्या जिल्ह्यात हजारो मैलांचे अंतर कापून विदेशी पक्षी दाखल झाले आहेत. जिल्ह्याच्या वैभवात भर घालणाºया या विदेशी पक्ष्यांवर मात्र आता स्थानिक शिकाºयांचा डोळा आहे. तलावात खाद्य शोधणाºया पक्ष्यांना निशाणा करून आपल्या जिभेचे चोचले पुरविले जात आहे. अनेक पक्षी जखमी होऊन मृत्युमुखी पडत आहे. या सर्व प्रकाराकडे स्थानिक वनविभागाचे मात्र दुर्लक्ष होत आहे.समशितोष्ण वातावरण, मुबलक खाद्य यामुळे पूर्व विदर्भात विदेशी पक्षी येतात. यंदाही हिवाळ्याच्या काळात जिल्ह्यातील तलावांवर विदेशी पक्षी उतरले आहेत.शेकडो प्रजातींच्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने तलाव गजबजून गेले आहे. स्कॉटलंड, युरोप, आईसलँड, फ्रांस आदी देशातून पक्षी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. १० ते १२ हजार किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी सध्या भंडारा जिल्ह्यात मुक्त संचार करताना दिसत आहे.मात्र या पक्ष्यांवर आता स्थानिक शिकाºयांचा डोळा आहे. विविध तलावांवर शिकारी आपले जाळे टाकून या पक्ष्यांची शिकार करीत असल्याचे दिसत आहे. या पक्ष्यांची शिकार करून शिकारी मांस विकत असल्याची माहिती आहे.अनेक पक्षी या शिकाºयांमुळे जखमीही होवून आपला प्राण गमावून बसतात. अतीशय देखणे असलेले शिकाºयांच्या तावडीत सापडत आहेत. या सर्व प्रकारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी वनविभागाची आहे. मात्र वनविभागाचे कर्मचारी या पक्ष्यांकडे दुर्लक्ष करतात. मोर, हरीण, रानडुक्कर आदी प्राण्यांची शिकार झाली की, वनविभागाचे पथक येवून धडकते. परंतु या पक्ष्यांची शिकार होत असताना कुणीही लक्ष देत नाही. जिल्ह्याचे वैभव असलेल्या या पक्ष्यांचे जतन करण्याची जबाबदारी वनविभागासोबतच स्थानिक नागरिकांची आहे. तेही याकडे कमालीचे दुर्लक्ष करतात. पक्षीप्रेमी केवळ गणणा आणि फोटो काढण्यातच व्यस्त दिसून येतात. सुरक्षेबाबत मात्र ते काही बोलायला तयार नाही.तलावांवर अतिक्रमणजिल्ह्याची ओळख तलावाचा जिल्हा म्हणून आहे. दीड हजारावर तलाव जिल्ह्यात आहेत. परंतु गत काही वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. अनेक शेतकऱ्यांनी तलावाशेजारी शेती करणे सुरू केले असून शेतीसाठी तलावावर अतिक्रमण केले आहे. यामुळे अनेक विदेशी पक्षी मुक्त संचार करताना घाबरतात. तसेच माणसांच्या गर्दीने ते येथे येण्याचे टाळत असल्याचे अलीकडच्या काळात दिसून येते.
विदेशी पाहुणे पक्षी शिकाऱ्यांच्या निशाण्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 1:06 AM
तलावाच्या जिल्ह्यात हजारो मैलांचे अंतर कापून विदेशी पक्षी दाखल झाले आहेत. जिल्ह्याच्या वैभवात भर घालणाºया या विदेशी पक्ष्यांवर मात्र आता स्थानिक शिकाºयांचा डोळा आहे. तलावात खाद्य शोधणाºया पक्ष्यांना निशाणा करून आपल्या जिभेचे चोचले पुरविले जात आहे.
ठळक मुद्देवनविभागाचे दुर्लक्ष : भंडारा जिल्ह्यात लाखो विदेशी पक्ष्यांची सुरक्षा धोक्यात