इंद्रपाल कटकवार/देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वनसंपदेने नटलेल्या पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्याला वनतस्करांची नजर लागली आहे. जंगलांमधील नुकसानीचे खुलेआम कत्तल होत असून वनतस्कर मालामाल होत आहेत. वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या आशिर्वादानेच हा सगळा प्रकार होत असल्याचे दिसून येत असतानाच यावर मात्र कुणीही बोलायला तयार नाही. ना वचक, ना कारवाई अशी स्थिती वनविभागांतर्गत दिसून येत आहे.तुमसर ते लाखांदूरपर्यंतच्या विस्तीर्ण भुभागात जंगलांचे प्रमाण मोठे आहे. विशेष म्हणजे राखीव जंगल शिवारातूनच वृक्षांची खुलेआम कत्तल होत आहे. राज्य मार्गाच्या कडेला असलेल्या झाडांची कत्तल होत असताना याकडेही वनाधिकारी सर्रास कानाडोळा करीत असल्याचे दिसून येते. कुंपनच शेत खात असेल तर दाद कुणाला मागायची, अशी स्थिती आहे. वनाधिकाऱ्यांच्या संगणमतानेच हा प्रकार घडत असून वनतस्करांचेही मनोबल वाढले आहेत.विशेष म्हणजे आजपर्यंत घडलेल्या अनेक खसरा प्रकरणे संशयाच्या भोवऱ्यात आहेत. या खसरा प्रकरणाची चौकशी झाल्यास अनेक लहान मोठे मासे गळाला लागू शकतात. तीन वर्षांपुर्वीच घडलेल्या एका प्रकरणात मृतकाच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार घडला होता. यात हजेरी रजिष्टरवर मृत पावलेल्या लोकांची नावे लिहून लक्षावधी रूपयांचे अनुदान लाटण्यात आले होते. मात्र तत्कालीन वनाधिकाऱ्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांनाच क्लिन चिट दिली होती. यावरूनच अनेक प्रकरण कशी हाताळण्यात आली असेल हे स्पष्ट होते.अनेक शेतकरी मदतीपासून वंचितशेतकºयांना नेहमी अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. अशातच उपद्रवी पशुमुळेही पिकांची नासाडी होत असते. पंचनामा झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना कितपत मदत मिळते याची माहिती कदाचित वनाधिकाºयांनाच असेल. आजही अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकाची नासाडी झाल्यानंतर मदत मिळालेली नाहीत. अनेक प्रकरणे विचाराधीन असल्याचे सांगण्यात येते. प्रस्ताव पाठविल्यानंतर किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतो याची माहितीही सार्वजनिक केली जात नाही.शिकारीच्या घटनामध्ये वाढदशकभरात वन्य प्राण्यांची शिकार होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे दिसून येते. विदर्भातील जंगलातील शान असलेल्या जय आणि जयचंद या रूबाबदार वाघांचा वनविभाग थांगपत्ता लागू शकले नाही. तुमसर वनविभागांतर्गत दोन वाघांच्या शिकारीसह वाघनखे व हरणाचे मांस जप्त केल्याचे प्रकरणही घडले होते. यात आरोपींना अटक करण्यात आले असले तरी वन्यप्राण्यांची शिकार होत आहे. विद्युत प्रवाहाच्या सहाय्याने वन्यप्राण्यांची शिकार केली जाते.वरिष्ठ-कनिष्ठांमध्ये मतभेदकोट्यवधी रूपयांचे महसूल उपलब्ध करून देणाºया भंडारा वनविभाग कार्यालयात वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाºयांमध्ये स्पष्ट मतभेद आहेत. यासंदर्भात जिल्हाभरातील वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकाºयांनी एकत्रित येवून उपवनसंरक्षक यांची मुख्य वनसंरक्षकांकडे तक्रार केल्याचेही सांगण्यात येते. यावरूनच वरिष्ठ व कनिष्ठ यांच्यातील मतभेदाचा वनतस्कर चांगलाच फायदा उचलत आहे. भ्रष्टाचाराचे कुरण ठरलेल्या वनविभागात सेटिंग असलेल्यांचे चांगभले मात्र होत असते, यात शंका नाही.
जंगलाचे हाल, वनतस्कर मालामाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 6:00 AM
इंद्रपाल कटकवार/देवानंद नंदेश्वर । लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : वनसंपदेने नटलेल्या पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्याला वनतस्करांची नजर लागली आहे. ...
ठळक मुद्देखसरा प्रकरणे संशयाच्या भोवऱ्यात : ना वचक कुणाचा, ना कुणावर कारवाई