यावेळी मानवाधिकार संघटनेचे डाॅ. देवानंद नंदागवळी, कम्युनिस्ट कर्मचारी संघटनेचे हिवराज उके व जिल्ह्यातील इतर संघटनेचे पदािधकारी उपस्थित होते. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दहा नवजात बालकांचा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला त्या बालकांना प्रथम श्रद्धांजली वाहण्यात आली. मृत्युमुखी पडलेल्या बालकांबाबत ठराव घेण्यात आला असून प्रशासनाविराेधात आंदाेलनाची भूमिका घेऊन शासनाला निवेदन देण्यात येणार आहे.
सदर सभेत सर्वानुमते जुन्या कार्यकारिणीलाच कायम ठेवण्यात आले असून त्यामध्ये फक्त विधी सल्लागार म्हणून ॲड. टी. एस. शिंगाडे यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष विनय सुदामे, महिला अध्यक्ष रजनी वैद्य, जिल्हा सिचव हरिशचंद्र धांडेकर, उपाध्यक्ष अनमाेल देशपांडे, युवराज रामटेके, सिध्दार्थ भाेवते, अजय रामटेके, विभागीय सहसचिव गाेपाल सेलाेकर, काेषाध्यक्ष अतुल मेश्राम, विधी सल्लागार ॲड. विलास कानेकर, ॲड. टी. एस. शिंगाडे, प्रमुख सल्लागार डाॅ. मधुकर रंगारी, डाॅ. व्ही. एन. राेकडे, डाॅ. देवानंद नंदागवळी, सहसचिव ओ. जी. ऊके, यशवंत उईके, प्रसिद्धिप्रमुख प्रफुल्ल घरडे, जिल्हा संघटक देवानंद नागदेवे, पांडुरंग चव्हाण, पी.जी. गणवीर, प्रवीण राठाेड, जिल्हा प्रतिनिधी सूर्यभान कलचुरी, एच. एच. बडाेले, महिला प्रतिनिधी नलिनी देशभ्रतार, श्रीमती आशा टांगले, सुनीता कुरसुंगे, श्यामकला पंचभाई व इतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.