ग्राम रामाटोला-सिल्ली येथे संजय सोविंदा बरेकर हा हातभट्टीने दारू गाळून विक्रीचा व्यवसाय करतो, या माहितीवरून पोलिसांनी त्याच्या घरावर धाड घातली. यात त्यांना घरात ४ रनिंग भट्ट्या आढळल्या. तसेच त्याच्या घराच्या मागील बाजूस २३० प्लास्टिक पोतडीत प्रति पोतडी २० किलोप्रमाणे ४,६०० किलो मोहा सडवा मोहवा ज्याची किंमत तीन लाख ६८ हजार रूपये आहे मिळून आला. तर डबकीत प्रत्येकी १० लिटरप्रमाणे २०० लिटर हातभट्टीची दारू, ४ लाकडी टवरे, ४ जर्मन घमेले, ४ लोखंडी ड्रम, ४ नेवार पट्टी, प्लास्टिक पाईप, ४ लोखंडी ड्रममध्ये ४० किलो गरम मोहा सडवा मोहवा, १२० किलो जळाऊ काड्या असा एकूण चार लाख सहा हजार ४०० रुपयाचा माल मिळून आला. तसेच आरोपी रनिंग भट्टी लावून मोहफुलाची दारू गाळताना मिळून आला.
सध्या कोविड-१९ ची साथ असल्याने आरोपीला अटक न करता कलम ४१(१)(अ) सीआरपीसी अन्वये नोटीस देण्यात आला आहे. पोलीस शिपाई विदेश अंबुले यांच्या तक्रारीवरून आरोपी संजय बरेकर याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नायक बांते करीत आहेत. ही कारवाई सपोनि हनवते, सपोनि जोगदंड, पोउपनि केंद्रे, विदेश अंबुले व पथकाने केली.