लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : कोविड-१९ च्या लॉकडाऊनमध्ये शासन निर्देेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोग्य विभागाअंतर्गत होम क्वॉरंटाईन करण्यात आले दोघे व दोन दुकानदारांना लाखांदूर न्यायालयाने दंडाची शिक्षा ठोठावली आहे.चंद्रकांत भागवत आमगवार (२२) रा. रोहणी, प्रकाश गोपीनाथ धोटे (२५) रा. डांभेविरली, मुलचंद पंढरी प्रधान (४७) रा. डोकेसरांडी व नंदकिशोर टिकाराम डोंगरवार (३४) रा. लाखांदूर अशी शिक्षा झालेल्या दोषींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, घटनेतील आरोपी होम क्वॉरंटाईन असलेले चंद्रकांत आमगवार, प्रकाश धोटे, तर दुकान चालक मुलचंद प्रधान व नंदकिशोर डोंगरवार यांनी कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी घोषीत केलेल्या लॉकडाऊनमध्ये शासन निर्देशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यामुळे सदर चार जणांविरोधात विरोधात लाखांदूर पोलिसांत भांदविचे कलम १८८, २६९ व २७० अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आले. तपास पूर्ण झाल्यानंतर सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले होते. याप्रकरणाचा खटला लाखांदूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग एस. बी. साबळे यांचे न्यायालयात चालविण्यात आला होता.या खटल्यात चारही आरोपीतांच्या विरोधात दोष सिद्ध झाल्याने न्यायालयाने संबंधितांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड अथवा दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या निकालाने लॉकडाऊनचे उल्लंघन करणााऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासन निर्देशानुसार तालुक्यातील सर्व होम क्वॉरंटाईन व्यक्तींनी, जीवनावश्यक दुकानांखेरीज अन्य दुकानदारांनी व तालुक्यातील सर्व जनतेनी शासन निर्देशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन लाखांदूर पोलीसांनी केले आहे. लॉकडाऊन ऊल्लंघन प्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या दोन्ही प्रकरणातील घटनेचा तपास लाखांदूरचे ठाणेदार शिवाजी कदम यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, पोलीस नायक वकेकार, पोलीस शिपाई सोनल गेडाम, पोलीस शिपाई मुंडे आदींनी केला.कोविड-१९ मध्ये शासनाने जमावबंदी व संचारबंदी केली असतांना काही नागरिकांकडून अनावश्यक संचार होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे उल्लंघन होतांनाच समाजातील अन्य घटकांना सदरच्या गैरकृत्यामुळे त्रास होणार नाही अथवा प्रादूर्भाव होणार नाही, याची काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे. लॉकडाऊनमध्ये सर्वांनी घरी राहून व सुरक्षित राहून शासन प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे.-शिवाजी कदम, ठाणेदार, लाखांदूर.
लॉकडाऊन उल्लंघनप्रकरणी चौघांना हजार रुपयांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 5:00 AM
चार जणांविरोधात विरोधात लाखांदूर पोलिसांत भांदविचे कलम १८८, २६९ व २७० अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आले. तपास पूर्ण झाल्यानंतर सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले होते. याप्रकरणाचा खटला लाखांदूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग एस. बी. साबळे यांचे न्यायालयात चालविण्यात आला होता.
ठळक मुद्देलाखांदूर न्यायालयाचा निकाल : दोन होम क्वॉरंटाईन व्यक्तींचा समावेश