शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाही?; ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत
2
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
3
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
4
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
5
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
6
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
8
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
9
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
10
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
11
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
12
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
13
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
14
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
15
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
17
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

चार संशयितांना चौकशीनंतर सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2016 1:03 AM

अज्ञात समाजकंटकांनी हनुमान मूर्तीची विटंबना केली. याप्रकरणी चार संशयीतांना ताब्यात घेण्यात आले होते.

देव्हाडी येथील प्रकरण : संभाषणाची रेकॉर्डिंग पोलिसांनी दिली तुमसर : अज्ञात समाजकंटकांनी हनुमान मूर्तीची विटंबना केली. याप्रकरणी चार संशयीतांना ताब्यात घेण्यात आले होते. मंगळवारी या चौघांनाही पोलिसांनी सोडले. दरम्यान मंदिर समिती सदस्याने एका ज्येष्ठ नागरिकानेच मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणाची संभाषणाची रेकॉर्डींग तुमसर पोलिसांना दिली. यानंतर एक वेगळेच वळण या प्रकरणाला लागले आहे.सोमवारी सायंकाळी देव्हाडी येथील हनुमान मंदिरातील मूर्तीची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्याच रात्री चार संशयीत आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान एक संशयीत आरोपी पसार झाला. मंगळवारी दिवसभर तुमसर पोलिसांनी संशयीत आरोपीची कसून चौकशी केली. मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास मंदिर समितीचे सदस्य मनोज चौबे यांनी मंदिराजवळील घरमालकाला मूर्ती विटंबनाप्रकरणी कुणी आढळले का? अशी विचारणा केली. तेव्हा आपणच मूर्तीची विटंबना केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान चार संशयीतांना तुमसर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी सोडले. या वरिष्ठ नागरिकाच्या आवारातच जुने हनुमान मंदिर आहे. सन १९७८ मध्ये १४,२८३ चौरस फुटचा भूखंड व पडके घर संबंधितांनी घेतले होते. त्यानंतर त्यांनी आभारभिंत तयार केली होती. परंतु हनुमान मंदिरात ये जा करिता त्यांनी जागा सोडली होती. हनुमान मंदिर परिसरात मद्यप्राशन तथा गांजा ओढणारे यांचा वावर असल्याने आपण त्रासून गेलो आहे अशी माहिती घरमालकाने पोलिसांना दिली. वरिष्ठ नागरिक असल्याने या प्रकरणात अटक करता येत नाही. परंतु संपूर्ण चौकशी व ठोस पुराव्यानंतर नियमानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)