लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लॉकडाऊनमुळे देशी-विदेशी दारुची दुकाने बंद असून आता मद्यपींनी आपला मोर्चा हातभट्टी दारुकडे वळविला आहे. गावानजीकच्या जंगलात आणि नाल्यांवर हातभट्या धूर ओकत असून गत महिन्याभरात पोलिसांनी १७० ठिकाणी धाडी टाकून ४६०७ लीटर हातभट्टीची दारु आणि २० हजार ६०२ किलो मोहपास जप्त केला. आठ दुचाकींसह २१ लाख ५४ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईने दारु गाळणाऱ्यांचे धाबे दणानले आहे.भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आले. जिल्ह्यातील देशी-विदेशी आणि बार व रेस्टारेंटला राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिल ठोकले. त्यामुळे मद्यपींना दारु सहज मिळणे कठीण झाले. सुरुवातीच्या १५ दिवसात अनेकांनी लॉकडाऊनच्या आधीच संग्रह करुन ठेवलेल्या दारु प्राशन केली. मात्र १४ एप्रिलनंतर पुन्हा लॉकडाऊनमध्ये वाढ झाली. शहरासह ग्रामीण भागातही दारु मिळणे कठीण झाले. सैरभैर झालेले मद्यपी आता थेट हातभट्टीची दारू प्राशन करायला लागले. याचाच फायदा घेत गावागावातील दारु विक्रेत्यांनी गावशिवारात हातभट्या पेटविणे सुरु केले. जिल्ह्यांच्या बहुतांश गावांमध्ये हातभट्टीची दारु सहज उपलब्ध होत आहे. गावानजीकच्या जंगलात आणि नाल्यांवर मोठ्या प्रमाणात दारु गाळली जात आहे.हा सर्व प्रकार पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यात १९ मार्च ते २२ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील १७० ठिकाणी धाडी मारल्यात. अनेक ठिकाणी रनिंग हातभट्टी उद्ध्वस्त करण्यात आली. चार हजार ६०७ लीटर हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली तर २० हजार ६०२ किलो मोहामाचरी जप्त केला.जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख गजानन कंकाळे आणि त्यांच्या पथकाने या धाडी मारल्या.बावनथडी नदीपात्रातील हातभट्टी उद्ध्वस्ततुमसर : बावनथडी नदीपात्रात लेंडेझरी वनपरिक्षेत्रांतर्गत खापा बीटमध्ये मोहफुलापासून दारु निर्मिती होत असल्याची माहिती मिळाली. याआधारे वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना गस्तीदरम्यान हा प्रकार उघडकीस आणला. वनकर्मचाºयांनी ही हातभट्टी उद्ध्वस्त केली. लेंडेझरी वनपरिक्षेत्राच्या सीमा नागपूर जिल्हा व मध्यप्रदेश राज्याला लागून आहेत. बावनथडी नदीपात्राच्या काठावर मोठ्या प्रमाणात मोहफुल दारु गाळप केंद्र सुरु आहेत. येथूनच आंतरराज्यीय मार्गाने मोहफुलापासून निर्मित दारुची तस्करी होत असते. गस्तीदरम्यान सदर प्रकार उघडकीला येताच लेंडेझरीचे वनपरिक्षेत्राधिकारी भडांगे, सहायक वनपरिक्षेत्रअधिकारी निखाडे व इतर कर्मचाºयांनी सदर गाळप केंद्र उद्ध्वस्त केले. अन्य गाळप केंद्रांचा शोध घेऊन ते उद्ध्वस्त करणे महत्वाचे आहे.वाहनातून दारुची तस्करीशहरी आणि ग्रामीण भागात आलीशान वाहनातून दारुची तस्करी होत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीत देशी आणि विदेशी दारुची वाहतूक उघडकीस आली. यासोबतचहातभट्टी दारु रबरी ट्यूबमधून वाहतूक केली जाते. अनेक गावात घरपोच दारु मिळत असल्याचे दिसत आहे.जिल्ह्यात अवैध दारुविरुध्द कडक कारवाई केली जात आहे. पोलिसांचे पथक अशा दारु विक्रेत्यांचा शोध घेत आहेत. दारु विक्रेत्यांची गय केली जाणार नाही. नागरिकांनी अशा दारु विक्रेत्यांची माहिती आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी.-गजानन कंकाळे,पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा
लॉकडाऊनमध्ये चार हजार लिटर हातभट्टी दारु जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 5:00 AM
जिल्ह्यातील देशी-विदेशी आणि बार व रेस्टारेंटला राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिल ठोकले. त्यामुळे मद्यपींना दारु सहज मिळणे कठीण झाले. सुरुवातीच्या १५ दिवसात अनेकांनी लॉकडाऊनच्या आधीच संग्रह करुन ठेवलेल्या दारु प्राशन केली. मात्र १४ एप्रिलनंतर पुन्हा लॉकडाऊनमध्ये वाढ झाली. शहरासह ग्रामीण भागातही दारु मिळणे कठीण झाले. सैरभैर झालेले मद्यपी आता थेट हातभट्टीची दारू प्राशन करायला लागले.
ठळक मुद्देदारु विक्रेत्यांना चपराक : २१ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल