या कारवाईची माहिती तहसीलदारांना देण्यात आली. तुमसर तहसीलदारांच्या आदेशावरून निरीक्षण अधिकारी राहूल रविंद्र वानखेडे यांनी सिहोरा पोलीस स्टेशन गाठले. त्यावेळी त्यांच्यासोबत पुरवठा निरीक्षक शालिनी वासकर होत्या. त्यांनी पंचनामा करून याबाबतची माहिती तहसीलदारांना दिली. तसेच सदर प्रकरणात योग्य कारवाई करण्यासाठी जिल्हा पणन अधिकाऱ्यांनाही पत्र पाठविण्यात आले.
त्यावरून सिहोरा पोलीस ठाण्यात जप्त असलेल्या वाहन मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सिहोराचा पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शहारे करीत आहेत.
बॉक्स
सीमावर्ती भागात चोरटी वाहतूक
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात धानाची चोरटी वाहतूक केली जात आहे. महाराष्ट्रात धानाला चांगला भाव मिळत असल्याने व्यापारी कमी किंमतीत मध्यप्रदेशात धान खरेदी करतात आणि महाराष्ट्रात आणून शेतकऱ्यांच्या सातबारावर विक्री करतात. दुसरीकडे महाराष्ट्रातील आधारभूत केंद्रावर शेतकऱ्यांचे धान एक ते दीड महिना प्रतीक्षेत असतात. या प्रकाराला पायबंद घालण्याची गरज आहे.