अथर्व जनार्धन बावने (४) रा. केसलापूर, ता. माैदा, जि. नागपूर असे मृताचे नाव आहे. तर जनार्धन किसन बावने (३७) आणि माधुरी जनार्धन बावने (३५) अशी जखमींची नावे आहेत.
नागपूर जिल्ह्यातील केसलवाडा येथून जनार्धन, पत्नी माधुरी आणि मुलगा अथर्व मंगळवारी सकाळी लाखनी साडभावाच्या मुलीच्या दुचाकी (एमएच४० बीझेड ५७८५)ने लग्न साेहळ्यात सहभागी हाेण्यासाठी जात हाेते. राष्ट्रीय महामार्गावरून जाताना भंडारा शहरातील जिल्हा परिषद चाैकात भरधाव टिप्पर (एमएच ३६ एए १५२३) मागाहून आला आणि राजीव गांधी चाैकाकडे वळायला लागला. त्याच वेळी धक्का लागून दुचाकी टिप्परच्या मागील चाकात आली. तिघेही खाली फेकले गेले. डाव्या बाजूच्या चाकाचा अथर्वच्या ओटीपाेटाला मार लागला. यावेळी परिसरातील नागरिकांनी धाव घेत तिघांनाही भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र अथर्वला गंभीर दुखापत झाल्याने त्याला भंडारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डाॅक्टरांनी मृत घाेषित केले.
लाॅकडाऊनच्या काळात रेती वाहतूक माेठ्या प्रमाणात सुरू असून रिकामे ट्रक भरधाव धावतात. त्यामुळे असे अपघात हाेत आहेत. या घटनेचा तपास ठाणेदार लाेकेश कानसे यांच्या मार्गदर्शनात पाेलीस हवालदार इर्शाद खान करीत आहेत. या घटनेने हळहळ व्यक्त हाेत आहे.
लग्नानंतर सात वर्षाने झाला मुलगा
बावने दाम्पत्याला लग्नाच्या सात वर्षांनंतर मुलगा झाला. त्यांना एक मुलगीही आहे. लाडाकाैतुकाने त्याचे लालनपालन सुरू हाेते. मात्र मंगळवारी रेतीचा ट्रक काळ हाेऊन आला आणि अथर्वचा बळी गेला.