आॅनलाईन लोकमतभंडारा : एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी २५ वर्षीय तरुणाला चार वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. राजू मेहंदळे रा.जैतपूर असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.माहितीनुसार, १९ फेब्रुवारी २०१४ रोजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास अल्पवयीन मुलगी जैतपूर येथे आजोबाच्या घरी पडवीत काम करीत असताना राजू हा घराच्या मागील बाजूने पडवीत प्रवेश केला. तसेच मुलीच्या विनयभंग केला. तरुणी ओरडल्याने तिचे मामा व अन्य नातेवाईक घटनास्थळी धावून आले. तसेच राजूच्या तावडीतून मुलीला सोडून पोलीस ठाणे दिघोरी येथे फिर्याद दाखल केली. पोलीस हवालदार शामराव चाचेरे यांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरून राजू मेहंदळे विरुद्ध भादंवि ४४८, ३५४ (अ) (१) कलमान्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास पोलीस हवालदार टोलीराम सार्वे यांनी करून राजूला अटक केली. आरोपीविरुद्ध पुरावे प्राप्त झाल्याने व न्यायालयात सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी उपरोक्त निर्णय सुनावला. यात कलम ४४८ भादंवि अन्वये ३ महिने सश्रम कारावास व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारवास तसेच कलम ८ अधिनियम २०१२ अंतर्गत ४ वर्ष सश्रम कारावास व पाच वर्ष दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास तीन वर्ष कारवास भोगावा लागणार आहे. दंडाच्या रकमेपैकी पाच हजार रुपये पीडित मुलीला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सरकारी पक्षातर्फे अॅड.प्रमोद भुजाडे यांनी बाजू मांडली. सदर प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक बबन पुसाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस शिपाई अजित वाहने यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.
विनयभंगप्रकरणी आरोपीला चार वर्षांचा सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:03 PM
एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी २५ वर्षीय तरुणाला चार वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. राजू मेहंदळे रा.जैतपूर असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.
ठळक मुद्देजिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल : प्रकरण लाखांदूर तालुक्यातील जैतपूर येथील