शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

सर्वधर्मसमभावाचा सुगंध दरवळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 10:38 PM

अड्याळ ग्रामवासी तथा परिसरातील ग्रामवासी मंगलमय दिवसाची वाट एखाद्या चातकाप्रमाणे पाहत असतात, तो क्षण म्हणजे जागृत हनुमंत देवस्थानमधील श्री हनुमंत जन्मोत्सव सोहळा होय.

ठळक मुद्देअड्याळ येथे आज घोडायात्रा : श्री हनुमान जन्मोत्सवात उसळणार भाविकांची गर्दी

विशाल रणदिवे ।आॅनलाईन लोकमतअड्याळ : अड्याळ ग्रामवासी तथा परिसरातील ग्रामवासी मंगलमय दिवसाची वाट एखाद्या चातकाप्रमाणे पाहत असतात, तो क्षण म्हणजे जागृत हनुमंत देवस्थानमधील श्री हनुमंत जन्मोत्सव सोहळा होय. घोडायात्रेच्या पर्वावर दर्शनासाठी विदर्भातील भक्तगण शनिवारी अड्याळ येथे गर्दी करणार आहेत. घोडायात्रेच्या यानिमित्ताने सर्वधर्म समभावनेचा सुगंध दरवळणार आहे.अड्याळ येथील घोडा यात्रा विदर्भात प्रसिध्द आहे. अड्याळ ग्रामस्थांची एकता सर्वांच्या दु:ख-सुखात मदतीला धावुन जाणारे ग्रामस्थांचा या घोडायात्रेच्या निमित्ताने श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते.त्यात अड्याळसह परिसरातील ८० गावांमध्ये एकता जोपासणारा सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळा कार्यक्रम पार पडतो. ही परंपरा आजही अड्याळ येथे कायम आहे.प्रसिध्द जागृत हनुमंत देवस्थानात पहाटे ५ वाजता हनुमंत जन्मोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. यानिमित्ताने मागील दशकभरापासून सुंदरकांड पठणाची परंपराही कायम आहे.छत्तीसगड राज्यातील कोरबा येथील विरेंद्र पांडे महाराज, हभप तिरथ बाराहाते (उज्जेन), किशोर देवईकर व भाविक भक्तगण मंडळीच्या उपस्थितीत हा जन्मोत्सव सोहळा होणार असल्याची माहिती हनुमंत देवस्थान समिती अध्यक्ष भाष्करराव पोटवार यांनी दिली. या जन्मोत्सवानिमित्ताने या दिवसाला अड्याळमधील गल्लीबोळीतही रामनामाची धून ऐकावयास मिळते. भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच गर्दी नियंत्रणासाठी गावातील स्वयंसेवक तसेच पोलीस यंत्रणाही मोठ्या संख्येने तैनात करण्यात आलेली आहे.सोहळ्याच्या मदतीसाठी अड्याळ ग्रामवासी जात, धर्म, पंथ बाजुला सारुण एकत्र येतात. त्यामुळे ईथे राष्टÑीय एकात्मतेचे दर्शन घडून येते.या सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळ्यात पहिल्या वर्षी दोन विवाह पार पडले होते. याचे अनुकरण आता परिसरातील गावागावांत पहायला मिळत आहे. ही अंत्यत समाधानाची बाब ग्रामविकास एकात्मता भागवत समिती अड्याळला असल्याची माहिती भैय्यासाहेब क्षीरसागर यांनी दिली.अड्याळ मधील घोडायात्रा पाहायला, हनुमान जन्मोत्सव सामूहिक विवाह सोहळा तसेच महाप्रसाद वितरणादरम्यान हजारोंच्या संख्येने भाविक भक्त मंडळी येणार असल्याचे माहिती भागवत समितीचे कार्यकारी अध्यक्ष रामकृष्ण कुर्झेकर यांनी ‘लोकमत’ला दिली.अनेकवर्षापासुन या पर्वावर नाथजोगी समाजबांधव मोठ्या संख्येने शेकडो वर्षापासून या जागृत हनुमान मंदिरात या दिवसाला दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारे तिर्थस्थळ म्हणून अड्याळची ओळख बनली आहे.विविध कार्यक्रमकोंढा कोसरा: कोंढा येथे हनुमान जंयतीनिमित्त हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोंढा येथील सार्वजनिक हनुमान देवस्थान येथे जागृती, गोपालकाल्याचे आयोजन केला आहे. मेनरोड, कोंढा येथील मंदिरात जागृती, प्रवचन व सर्व भक्तांकरिता महाप्रसादाचे आयोजन केले आहे. चुºहाड (कोसरा) येथील मंदिरात जागृती, प्रवचन व महाप्रसाद यांचे आयोजन केले आहे.