सदर शिबिरात डॉ. राहुल डगवार, डॉ. जगदीश तलमले यांनी आरोग्य तपासणी केली. याप्रसंगी एकूण २५४ जणांनी शिबिराचा लाभ घेतला. आधीच कोरोनाने ग्रामीण भागातील जनता आर्थिकदृष्ट्या खचलेली असून त्यांना आरोग्याविषयी लाभ व्हावा यासाठी अशा शिबिराची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मानस ॲग्रोचे वरिष्ठ व्यवस्थापक यतीश परसोडकर यांनी केले.
याप्रसंगी सरपंच सिंधू डाहुले, उपसरपंच अमोल थेरे, पोलीसपाटील अविनाश थेरे, सीमा मोहिते, प्लांट इंचार्ज आशुतोष भिशीकर, सियान ॲग्रोचे स्वप्निल बेरड, व्यवस्थापक विनोद हिंगे, अशोक देवाळकर, शैलेश भोयर, नरेंद्र रासेकर, गोपीचंद चंदनबावणे, प्रदीप बोकडे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन आशुतोष भिशीकर यांनी केले, तर आभार विनोद हिंगे यांनी मानले.