खासदार सुनील मेंढे यांच्या सहकार्याने, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पवनी तालुक्यासाठी मिळाले आहेत. ही सेवा नि:शुल्क असली तरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर घेऊन जाणाऱ्या रुग्णाला काही अनामत जमा करावी लागणार आहे. मशीनचे काम झाल्यानंतर ही अनामत रक्कम संबंधितांना परत मिळेल. सोबतच आधार कार्ड सादर व जिथे रुग्ण असेल तिथे प्रशिक्षित व्यक्तीकडून मशीन लावून देण्यात येईल. हे मशीन भाजपा कार्यालय पवनी येथे उपलब्ध आहे. संपर्कासाठी राजेंद्र फुलबांधे, प्रकाश कुर्झेकर, हिरालाल वैद्य, शरद देव्हाळे, माधुरी नखाते, अनुराधा बुराडे, निर्मला तलमले, मच्छिंद्र हटवार, संदीप नंदरधने, दत्तू मुनरतीवार, दिनेश कोरे, ॲड. खेमराज जिभकाटे, डाॅ. विनायक फुंडे, विलास डहारे, देवानंद खोपे, विवेक अवचट, सुरेश अवसरे यांच्यासोबत संपर्क साधावा, असे आवाहन भाजपा पवनी तालुका अध्यक्ष मोहन सुरकर यांनी दिली आहे.
पवनी येथे मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:37 AM