लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बँकांना दिलेले पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी कर्जाचे वाटप १५ जुलैपर्यंत न करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांमधील शासकीय खाती गोठवून जिल्हा बँकेकडे वळती करण्याचा इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारला बैठकीत दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात पिककर्ज वाटप, मावा व तुडतुडा, पिक नुकसानीचे मदत वाटप, कर्जमाफी, वृक्ष लागवड या विषयावर आयोजित बैठकीत ते बोलत होते.या बैठकीला आ.डॉ.परिणय फुके, आ.चरण वाघमारे, आ.बाळा काशिवार, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री म्हणाले, बँकांनी शेतकºयांना पिक कर्ज वाटपात टाळाटाळ केल्यास राष्ट्रीयकृत बँकांमधील शासकीय ठेवी जिल्हा बँकेत वळती करण्यात येतील. बँकांनी शेतकºयांसोबत चांगले व्यवहार करणे अपेक्षित असून बँका शेतकºयांसोबत असतील तरच सरकार बँकांसोबत राहील, असा इशाराही त्यांनी दिला.खरीप पिक कर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३५ हजार ६४४ सभासदांना १६४ कोटी ७६ लाख रूपयांचे पिक कर्ज वाटप केले आहे. त्यातुलनेत राष्ट्रीयकृत बँकांनी उद्दिष्टांपेक्षा कमी कर्ज वाटप केले आहे. यावेळी पालकमंत्र्यांनी बँकनिहाय कर्ज वाटपाचा आढावा घेतला.मावा, तुडतुडा नुकसानीचे मदत वाटपमावा व तुडतुडा रोगांच्या प्रादुर्भावाने झालेल्या धान पिकाच्या नुकसानीसाठी आलेल्या मदत वाटपाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात १ लाख ७२ हजार ७०९ शेतकरी बाधित असून यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जिल्ह्यासाठी ६७ कोटी ९२ लाख रूपये मिळाले. यापैकी ६७,४३६ शेतकऱ्यांच्या खात्यावर २७ कोटी ८२ लाख २८ हजार रूपये जमा करण्यात आले, असे जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी सांगितले.६४,४१५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यातील ६४ हजार ४१५ शेतकºयांच्या कर्ज खात्यात १८८ कोटी ४३ लाख रूपये जमा करण्यात आले आहे. प्रत्येक शेतकºयांना कर्जमाफीपोटी त्यांच्या खात्यात किती रक्कम जमा झाली. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप करावे, असे निर्देश दिले. एक लाख रूपयांपर्यंतच्या कजार्साठी केवळ सातबारा मागण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.प्रत्येक बँक शाखेने १०० वृक्ष लावावेया बैठकीत पालकमंत्र्यांनी १ जुलै ते ३० जुलै दरम्यान करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवड मोहिमेचा आढावा घेतला. बँकांनी वृक्ष लागवड मोहिमेत सक्रीय सहभाग घेऊन प्रत्येक शाखेने किमान १०० वृक्ष लावावे, असे त्यांनी सांगितले. पालकमंत्री पांदन योजना, आधार कार्ड, उज्ज्वला योजना, सर्वांना घरकुल, अतिक्रमित पट्टे वाटप, वर्ग एकच्या जमीनीचे वर्ग दोनमध्ये रूपांतरण व मुद्रा योजनेचा लाभ देण्यासाठी गावनिहाय व तालुकानिहाय विशेष शिबिर घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केले आहेत.
पीककर्ज न देणाऱ्या बँकांची शासकीय खाती गोठवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:34 PM
लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बँकांना दिलेले पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी कर्जाचे वाटप १५ जुलैपर्यंत न करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांमधील शासकीय खाती गोठवून जिल्हा बँकेकडे वळती करण्याचा इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारला बैठकीत दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात पिककर्ज वाटप, मावा व तुडतुडा, पिक नुकसानीचे ...
ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे निर्देश : पीककर्ज वाटप, कर्जमाफीवर आढावा