लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वेतन पुनर्रचनेसह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवार व शनिवारी संप पुकारला होता. या पार्श्वभूमीवर बँकीग व्यवस्था ठप्प असल्याने एटीएममध्येही रोकडचा ठणठणाट झाला. परिणामी शहरासह ग्रामीण भागात एटीएममध्ये रक्कम नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या ५० पेक्षा जास्त एटीएम आहेत. शुक्रवारपासून बँकांचे अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या आवाहनावरुन संपावर गेल्याने बँक उघडल्या नाहीत. परिणामी रोकड काढण्यासाठी बहूतांश नागरिकांनी एटीएमचा पर्याय निवडला. शुक्रवारीच एटीएममधील रोकड संपली. परिणामी ग्रामीण भागातून शहरात कामानिमित्त आलेल्या शेकडो ग्राहकांची प्रचंड गैरसोय झाली. बहूतांश जणांना संप असल्याची माहिती नसल्याने आल्यापावली परत जावे लागले.जिल्ह्यातील सातही तालुका मुख्यालयी असलेल्या भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र यासह अन्य राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा संपामुळे बंद होत्या. उल्लेखनिय म्हणजे ग्रामीण भागात असलेल्या एटीएममध्ये आधीच निधीचा वाणवा असतो. परिणामी रोख रक्कम काढण्यासाठी नागरिक शहराकडे धाव घेतात. बँकांच्या संपामुळे एटीएममधील रोख रक्कम लवकरच संपली. अशास्थितीत ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. शहरातील राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम शोभेची वास्तु ठरले. शुक्रवार व शनिवार बँकेचा संप तर रविवारी शासकीय सुटी असल्याने एटीएममध्ये रोकड घालता आली नाही. परिणामी याचाही फटका नागरिकांनाच बसला.विशेषत: अतिआवश्यक कामांसाठी शहरात आलेल्या नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. यात वृध्दांची मोठ्या प्रमाणात परवड झाली. ग्रामीण क्षेत्रातून आलेल्या वृध्दांची संपाची माहिती नसल्याने बँकाच्या पायरीवर बसून बँक उघडण्याची वाट पाहू लागले. मात्र संप असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांची निराशा झाली. त्यांनाही येण्या-जाण्याचा शारीरिक त्रास तर झालाच याशिवाय आर्थिक भुर्दंडही बसला.तांत्रिक अडचणींचा फटकाएकीकडे केंद्र शासन कॅशलेस व्यवहारावर भर देण्याचा प्रयत्न करीत असले तरी अनेक व्यवहार रोख पध्दतीने करण्यात येतात. एटीएममध्ये रोकडचा ठणठणाट असतांना अनेकांनी कॅशलेस व्यवहार करण्यावर भर दिला. मात्र त्यातही इंटरनेट कनेक्टीव्हीटी या तांत्रिक समस्येला तोंड द्यावे लागले. पेट्रोलपंप, व्यापारी प्रतिष्ठान यासह अन्य ठिकाणी एटीएम कार्ड वापरण्यासाठी गेलेल्या नागरिकांनाही वाईट अनुभव आले. अनेक ठिकाणी रेंज नसल्याने व्यवहार होवू शकले नाहीत. परिणामी रविवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने तांत्रिक अडचणींअभावी अनेकांची कामे खोळंबली होती.‘आऊट ऑफ सर्व्हिस’अनेकांना संप असल्याचे माहित नसल्याने ग्राहक आल्यापावली परतले. तर एटीएममध्ये कॅश उपलब्ध नसल्याने अनेक मशीनमध्ये आऊट आॅफ सर्व्हिस असा संदेश झळकत होता. उल्लेखनिय म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांनी गॅलरी मधील सूविधाही फेल ठरल्याची दिसून आली.
एटीएममध्ये रोकडचा ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 6:00 AM
जिल्ह्यातील सातही तालुका मुख्यालयी असलेल्या भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र यासह अन्य राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा संपामुळे बंद होत्या. उल्लेखनिय म्हणजे ग्रामीण भागात असलेल्या एटीएममध्ये आधीच निधीचा वाणवा असतो. परिणामी रोख रक्कम काढण्यासाठी नागरिक शहराकडे धाव घेतात. बँकांच्या संपामुळे एटीएममधील रोख रक्कम लवकरच संपली.
ठळक मुद्देग्राहकांना मनस्ताप : राष्ट्रीयीकृत बँकांच्या संपाचा फटका, कॅशलेस व्यवहारही अडचणीत