लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पावसाळ्याच्या दिवसात वीज अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पावसाळा सुरू होताच तुमसर तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच वीज विभागाचे स्थानिक तांत्रिक कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने रात्रभर वीज पुरवठा बंद राहत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे.तालुक्यातील आष्टी परिसरातील नागरिकांतून वीज विभागाच्या कर्मचाºयांविरूद्ध प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.वीजपुरवठा त्वरीत सुरळीत न झाल्यास पंचायत समिती सदस्य शिशुपाल गौपाले यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. पावसाला सरवात होताच हमखास तात्काळ वीज पुरवठा खंडीत होतो. शहरी भागात अभियंते तथा कर्मचारी तात्काळ दुरूस्ती करून वीज पुरवठा पूर्ववत करतात ,परंतु ग्रामीण परिसरात मात्र वीज वितरण विभागाचे कर्मचारी याकडे कानाडोळा करत असल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागते. मागील चार दिवसापासून तुमसर तालुक्यात पाऊस पडत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी वीज पुरवठा नेहमीच खंडीत होत असून रात्रभर बंद राहतो. रविवार व सोमवारी रात्री वीज पुरवठा खंडीत होता. तुमसर शहराचा भंडारा रोडवरील परिसर व देव्हाडी परिसरात सोमवारी रात्री वीजपुरवठा खंडीत होता. देव्हाडी परिसरात जंप्पर तुटल्याने रात्रभर कमी दाबाचा वीज पुरवठा होता.आष्टी येथील नागरिक संतप्तआष्टी हे तुमसर तालुक्याचे शेवटचे टोक आहे. येथे मागील पंधरा दिवसापासून कायम वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. पाऊस सुरू होताच वीज पुरवठा खंडीत होतो.त्यामुळे रात्रभर गावात वीज पुरवठा बंद राहतो. या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांत प्रचंड चीड निर्माण झाली आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे त्वरीत लक्ष देण्याची गरज आहे.कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडेआष्टी परिसरातील वीज वितरण कार्यालयाचे तांत्रिक कर्मचारी नागपूर, भंडारा, तुमसर येथून अप-डावून करतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यास पावसाळ्यात सरपटणाऱ्या जीव जंतुमुळे नागरिकांच्या जीवाला धोका वाढला आहे. मुख्यालयी न राहणाऱ्या संबंधित कर्मचाºयांवर तात्काळ कारवाईची मागणी पंचायत समिती सदस्य शिशुपाल गौपाले यांनी केली आहे.
तुमसर तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 10:23 PM
पावसाळ्याच्या दिवसात वीज अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पावसाळा सुरू होताच तुमसर तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच वीज विभागाचे स्थानिक तांत्रिक कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने रात्रभर वीज पुरवठा बंद राहत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे.
ठळक मुद्देआष्टीकर रात्रभर अंधारात : डासांमुळे नागरिक त्रस्त, महावितरणच्या कर्मचाऱ्यांबद्दल गावकऱ्यांमध्ये रोष