शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

खाद्यतेलाचा वारंवार वापर हा तर गुन्हा; हाेऊ शकतो कॅन्सर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:38 AM

भंडारा : ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वत:च्या फायद्यासाठी वारंवार तेच तेल वापरू नये, अन्यथा आपण ग्राहकांना कर्करोगाच्या मुखात टाकाल. ...

भंडारा : ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वत:च्या फायद्यासाठी वारंवार तेच तेल वापरू नये, अन्यथा आपण ग्राहकांना कर्करोगाच्या मुखात टाकाल. आपला व्यवसाय करताना ग्राहकांना वेठीस धरू नका, अन्यथा आपल्याला कारवाईस सामोरे जावे लागेल.

भंडारा जिल्ह्यात असलेल्या १६० हॉटेलांत पदार्थ तळण्यासाठी वारंवार तेच तेल वापरले जात असेल तर अशा हॉटेलचालकांवर आता अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाई होणे अटळ आहे. हॉटेलात तळीव पदार्थांसाठी वापरणारे तेल वारंवार वापरले जाते. ते तेल २५ पोलार युनिटच्या वर वापरू नये, अशा सूचना असतानाही हॉटेलचालकांकडून काळेकुट्ट तेल होईपर्यंत वापरले जाते. या तेलातून तळलेले पदार्थ सेवन केल्यास ग्राहकांना कर्करोगासारख्या आजाराला सामोरे जावे लागू शकते. ‘रियूज कुकिंग ऑईल’ वापरणाऱ्यांवर मात्र आतापर्यंत एकही कारवाई झाली नाही. भंडारा शहरात अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी भंडारात तपासणी केली; परंतु या तपासणीत काहीच निष्पन्न झाले नाही. या अधिकाऱ्यांनी अचानक धाड घातल्यास मोठ्या प्रमाणात होत असलेले रियूज तेल अधिकाऱ्यांना सापडेल. मात्र, आरोग्याला हानिकारक असलेल्यांवर कारवाई शून्य आहे.

फुटपाथवरील पदार्थ न खाल्लेले बरे...

फुटपाथवर असलेल्या हॉटेलात वापरण्यात येणारे तेल अनेकवेळा वापरले जाते. त्या तळलेल्या तेलातून पुन्हा तळलेले पदार्थ सेवन केल्यास कर्करोग होऊ शकतो.

फुटपाथवर असलेल्या हॉटेलातील पदार्थांची पाहिजे तेवढी काळजी घेतली जात नाही. रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची धूळ त्या पदार्थांवर बसते.

रस्त्याच्या कडेला असलेले तळलेले पदार्थ सेवन केल्यास अनेक आजाराला सामोरे जावे लागू शकते. त्या पदार्थांवर माशा बसतात. शिळे पदार्थही तळून विक्रीला ठेवलेले असतात.

तेलाचा पुनर्वापर आरोग्याला घातक

समोसा, कचोरी, भजे व तेलात तळले जाणारे इतर पदार्थ यासाठी वारंवार त्याच तेलाचा वापर होऊ नये, तेलाचा पोलार युनिट २५ पर्यंतच वापरण्याची परवानगी शासनाने दिली आहे. त्यापेक्षा जास्त तेल वापरले गेले तर त्या हॉटेलचालकांना कारवाईस सामोरे जावे लागणार आहे; परंतु भंडारा जिल्ह्यातील अनेक हॉटेलात रियूज तेल वापरले जाते. ते आरोग्याला घातक आहे.

डॉक्टरांचा सल्ला

शक्यतो बाहेरचे खाणे टाळावे, घरातील पदार्थ शुद्ध असतात. स्वत: बनविलेल्या पदार्थांची खात्री १०० टक्के असते. बाहेरचे खाल्ल्याने व्यक्तीला विविध आजारांना बळी पडावे लागू शकते.

- डॉ. यशवंत लांजेवार, बालरोगतज्ज्ञ, भंडारा.

बाहेरचे खाल्ल्याने ते पदार्थ शिळे आहे किंवा वारंवार त्याच तेलातून तळून ठेवण्यात आले आहे हे कुणाला ठाऊक नसते. अनेक लोक पैशाच्या हव्यासापायी आरोग्याची पर्वा न करता ग्राहकांशी खेळ करीत आहेत. त्यामुळे शक्यतो घरातीलच खावे.

- डॉ. प्रफुल नंदेश्वर, भंडारा.

हॉटेल व फरसाण दुकानचालकांनी वारंवार तेच तेल वापरू नये, अन्यथा त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. ज्या हॉटेलात ५० लिटरपेक्षा अधिक तेलाची गरज पडते, अशा हॉटेलांतील तपासण्या आधी करण्यात येत आहेत. नियम तोडल्यास कारवाईस सामोरे जावे लागेल.

- अभय देशपांडे, सहायक आयुक्त, अन्न व प्रशासन विभाग, भंडारा.