लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रोहयो कामात डोंगरला ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अपहाराची रक्कम वसुल करुन त्यांचे विरुध्द तात्काळ एफआयआर दर्ज करण्यात यावे असे निर्देश मनोजकुमार सुर्यवंशी यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) आडे यांना ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या समस्येवर युनियनच्या पदाधिकाºयासोबत चर्चेच्या वेळी दिले.महाराष्टÑ राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) जिल्हा भंडाराच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यासाठी २८ आॅगस्ट ला कॉ. राणा भवन भंडारा येथून युनियनचे कार्याध्यक्ष कॉ. शिवकुमार गणविर अध्यक्ष माधवराव बांते, जिल्हा सचिव हिवराज उके यांच्या नेतृत्वात भव्य बाईक मोर्चा काढण्यात आला व जिल्हा परिषदेवर नेण्यात आला. सहा मागण्यांचे निवेदन एका शिष्टमंडळाद्वारे देवून मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. भंडारा यांचेसोबत चर्चा करण्यात आली.चर्चेत डोंगरला ग्रामपंचायतचे पदाधिकाºयांविरुध्द फौजदारी गुन्हा दर्ज करुन अपहाराची रक्कम वसुल करण्यात येईल, करवसुलीचे काम एकट्या ग्रामपंचायत कर्मचाºयांने नव्हे तर कायदेशिर जबाबदारी असणाºयांनी करावी, ग्रामपंचायत कर्मचाºयांना दरमहा विशेष भत्यासह जि.प. मार्फत बँकेतर्फे देण्यात येईल व त्यासाठी ग्रामपंचायतीकडून ३ महिन्याचे वेतन ग्रा.पं. तर्फे जि.प. मागणी करेल, आकृतीबंधानुसार ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी नियुक्त करण्यात येतील. तसेच पदाचा दुरुपयोग करतील त्याचे विरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, असे सीईओ मनोजकुमार सुर्यवंशी यांनी सांगितले.शिष्टमंडळात माधवराव बांते, शिवकुमार गणविर, हिवराज उके, गजानन लाडसे, रामलाल बिसने, मारोती चेटुले, माणिक लांबट, राजेश दिवटे, देवेंद्र लांजेवार, हेमराज वाघाडे, गणेश धुमनखेडे, खेमराज शरणागत यांचा समावेश होता. शेवटी झालेल्या चर्चेची माहिती शिवकुमार गणविर व हिवराज उके यांनी दिली.
जिल्हा परिषदेवर ग्रामपंचायत कर्मचाºयांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:19 PM