लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : मोहाडी-तुमसर राज्य मार्गावर एन. जे. पटेल महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या छोट्या ओढ्यावर पूल आहे. पाण्याचा प्रवाह जाण्यासाठी सहा खाण्यापैकी तीन खाणे माती घालून बंद करण्यात आले. एवढेच नाही तर ती शासकीय जागा आपल्या ताब्यात मोहाडीतील एका व्यक्तीने घेतली आहे.शासकीय जागा ताब्यात घेवून मालकी हक्क बजावणे आता सोपे काम झाले आहे. महसूल विभागाकडे तक्रारी जातात. तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात येते. कधीतर प्रशासनातील अधिकारी व अतिक्रमणधारक समन्वय मामला रफातफा करुन घेतात. त्यामुळे शासकीय जागेवर कब्जा करणे सुलभ झाले आहे. असाच प्रकार मोहाडी येथे बघायला मिळत आहे. एन जे पटेल कॉलेजच्या शेजारी एक ओढा आहे. त्या ओढ्यावर इंग्रजकालीन पूल तयार करण्यात आला आहे. या पुलाच्या अगदी काठावर मोहाडी येथील एका व्यक्तीचा लॉन आहे. या लॉन मालकाने नदीकाढील जागा ताब्यात घेण्यासाठी पुलाचे तीन दरवाजे मातीने बंद केले. तसेच ओढ्याच्याही जागेत माती घालून खरेदी जागेपेक्षा अधिक जागा व्यापली आहे. ही जागा ओढ्याची व काठावरील आहे. नदीची जागा व्यापून मालकी केली जाण्याची मोहाडीतील पहिलीच घटना आहे. याबाबत महसूल विभागाकडे तोंडी तक्रार गावातील काही व्यक्तींनी केली. परंतू अद्यापही त्या तोंडी तक्रारीबाबत पावले महसूल विभागाने उचलली नाहीत. त्यामुळे महसूल विभागच शासकीय जागा मालकांना ताब्यात देण्यासाठी पाठबळ देत आहे काय असा प्रश्न विचारीत आहेत. यावर तहसीलदार धनंजय देशमुख काय भुमिका घेतात हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.
मोहाडीत माती घालून पुलाचे दरवाजे अडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 9:47 PM
मोहाडी-तुमसर राज्य मार्गावर एन. जे. पटेल महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या छोट्या ओढ्यावर पूल आहे. पाण्याचा प्रवाह जाण्यासाठी सहा खाण्यापैकी तीन खाणे माती घालून बंद करण्यात आले. एवढेच नाही तर ती शासकीय जागा आपल्या ताब्यात मोहाडीतील एका व्यक्तीने घेतली आहे.
ठळक मुद्देमहसूल विभागाची डोळेझाक : नदीची जागा ताब्यात, अधिकाऱ्यांना केलेली तक्रार ठरली निष्फळ