लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : वन्यप्राण्यांना विशेषत: माकडे, हरीण व जंगलातील फळवर्गीय, पानेवर्गीय वृक्षावर जगणारे वन्यप्राणी यांचेसाठी जंगलात फळझाडांची लागवड करणे आवश्यक झाले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र रोजंदारी वनमजूर संघटनेचे अध्यक्ष युवराज रामटके यांनी केले आहे.भंडारा तालुक्यातील खुटसावरी येथे एका कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी पर्यावरण संघटनेचे पदाधिकारी व रोजंदारी वनमजूर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित हाते.जंगलात फळवर्गीय, पानेवर्गीय वृक्षांची लागवड झाली की, फळवर्गीय वृक्षावर जगणाऱ्या वन्यप्राण्यांची संख्या वाढणार व फळवर्गीय जगणाºया प्राण्यांची संख्या वाढली की, मांसाहारी जसे वाघ, बिबट यासारखे प्राणी खेडेगावाकडे किंवा जंगलव्याप्त भागाकडे धाव करणार नाही. त्यासाठी जंगलात फळझाडांची लागवड करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे, असेही प्रतिपदन युवराज रामटके यांनी केले. ते म्हणाले, वन्यप्राणी व मानव संघर्ष दिवसेंदिवस वाढीस लागला आहे. जंगलातील फळझाडे पूर्णत: नष्ट झाली आहेत. त्यामुळे जंगलातील प्राणी गावाच्या दिशेने येत आहेत. यामुळे जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात फळवर्गीय झाडांची लागवड करणे अत्यावश्यक बाब झाली आहे. फक्त झाडे लावूनच होणार नाही तर त्यांची जोपासना योग्य पध्दतीने करुन किमान पाच ते दहा वर्षापर्यंत संगोपन करण्याचीही जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे.वनविभागाने अनेक वर्षांपासून केवळ इमारती, लाकूड मिळविण्याच्या दृष्टीनेच झाडांची लागवड केली आहे. त्यात सागवन, सिसम, बीजा यासारख्या बहुतेक झाडांचा समावेश आहे. त्यात इमारती, लाकूड मिळणाºया झाडांची संख्या अधिक असल्याचेही बोलले जात आहे. जंगलातील फळवर्गीय झाडांची संख्या वाढविण्यासाठी शासनस्तरावर प्रशासकीय यंत्रणेला पुढाकार घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.पिकांचे नुकसानवन्यप्राणी गावाच्या दिशेने जंगलामध्ये फळवर्गीय झाडांची कमतरता असल्याने जंगलात राहणारे वानर, हरिण, डुक्कर यासारखे प्राणी गावाकडे, शेताकडे येवून पिकांचे नुकसान करीत आहेत. पयार्याने वन्यप्राणी व मानव संघर्ष वाढीला लागला आहे. हा संघर्ष थांबवून पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर जंगलामध्ये फळवर्गीय झाडांची लागवड करणे गरजेचे झाले आहे.
जंगलात फळझाडांची लागवड गरजेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 6:00 AM
लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : वन्यप्राण्यांना विशेषत: माकडे, हरीण व जंगलातील फळवर्गीय, पानेवर्गीय वृक्षावर जगणारे वन्यप्राणी यांचेसाठी जंगलात फळझाडांची ...
ठळक मुद्देयुवराज रामटेके : भंडारा तालुक्यातील विविध गावांत फळवर्गीय, पानेवर्गीय वृक्षांविषयी जनजागृती