आॅनलाईन लोकमततुमसर : शहराच्या विकासासाठी कोट्यवधींच्या विकासकामांना निधी मिळावा याकरिता तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. न.प.च्या शतकोत्तर सुवर्ण जयंती कार्यक्रमाचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी स्विकारले आहे.संपूर्ण शहराचा विकास करणे हा केंद्रबिंदू लक्षात घेवून नगर परिषदेची पाणी पुरवठा योजना बांधकाम विभागांतर्गत प्रस्तावित सिमेंट रस्ते, नाल्या, दलित वस्ती सुधार, सभागृहाचे बांधकाम, शाळा परिसर विकास, खुल्या जागेत बगिचे आदी तर पाणी पुरवठा विभागातील पाणी पुरवठा बळकटीकरणांतर्गत नवीन टाकी, नवीन पंप व आरोग्य विभागांतर्गत भूमिगत गटारे व सांडपाणी प्रक्रिया, कॉम्पॅक्ट व्हेईकल व्हॅक्युम एमटियर आदीसाठी कोट्यवधी रूपयांचे कामे नगर परिषदेने प्रस्तावित केले आहे.प्रस्तावित कामांना मंजुरी देवून विकास निधी द्यावा, यासाठी तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी आमदार चरण वाघमारे यांच्यासह भेट घेतली. प्रस्तावित विकास कामांचा निधी देण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिरवी झेंडी दिली आहे. त्यामुळे येणाºया काळात शहरात अनेक विकास कामे होणार आहे. या निधीतून शहराचा कायापालट करू असा विश्वास नगराध्यक्ष प्रदीप पडोळेंनी दिली व्यक्त केला आहे.
निधीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 11:49 PM
शहराच्या विकासासाठी कोट्यवधींच्या विकासकामांना निधी मिळावा याकरिता तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
ठळक मुद्देकोट्यवधींचे प्रस्ताव : शतकोत्तर सुवर्णजयंतीला मुख्यमंत्री येणार