तुमसर : तुमसर व मोहाडी तालुक्यातील रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यांवर मोठे खड्डे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातात वाढ होत आहे. नागरिकांच्या जीव सुरक्षित राहावा याकरिता केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत निधी देण्याची मागणी माजी खा. शिशुपाल पटले यांनी केंद्रीय परिवहनमंत्री नितिन गडकरी यांना केली आहे. मंत्री नितीन गडकरी यांची माजी खा. शिशुपाल पटले यांनी भेट घेऊन निवेदन दिले. यात देव्हाडा बु., नरसिंग टोला ते साकोली रस्ता ५० किमी, चुल्हाड ते चांदपूर देवस्थान ७ किमी, जांब ते गायमुख देवस्थान दहा किमी, जांब ते गायमुख देवस्थान दहा किमी, बघेडा ते लेंडेझरी ३० किमी या रस्त्यांचा समावेश आहे. हे रस्ते सीआरएफ अंतर्गत मंजूर करण्याची मागणी माजी खासदार शिशुपाल पटले यांनी केली.
तुमसर मोहाडी तालुक्यातील रस्त्यांना निधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:42 AM