लाभार्थ्यांचे संसार पडले उघड्यावर
तुमसर : नगर परिषद तुमसर येथे सन २०१७-१८ मध्ये प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ३६४ घरकुलाचे प्रकल्प मंजूर करण्यात आले होते त्यानुसार लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामाला सुरूवातही केली मात्र केंद्र शासनाकडून आता पर्यंत त्याघरकुलाकरिता एक दमडीही दिली गेली नाही परिणामी तुमसर शहरातील ३६४ घरकुल बांधकाम अडले असून लाभार्थ्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत ही सत्य परिस्थिती असतांना न प प्रशासन मात्र राज्य सरकारवर खापर फोडून लाभार्थ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप होत आहे.तुमसर शहरात प्रधानमंत्री आवास योजनेचा मोठा गाजावाजा करीत २०१७ मध्ये शहरातील अडीच हजार च्या ही वर लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते आलेल्या अर्जाची छाननी नंतर १२९० अर्ज ग्राह्य धरून अर्जाच्या पडताडणी केल्या नंतर ३६४ लाभार्थ्यांच्या अर्जाला मंजुरी देण्यात आली होती. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत केंद्र शासनाकडून १५०००० रुपये तर राज्य शासनाकडून एक लक्ष रुपये असे एकूण अडीच लक्ष रुपये लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाकरीता मिळणार होते त्यानुसार राज्य शासनाने तुमसर नगर परिषदेला ३६४ कोटी रुपये टप्प्या टप्प्याने दिले मात्र केंद्र शासनाकडून दीड लाखापैकी एक दमडीही पालिकेला मिळाला नाही परिणामी घरकुल लाभार्थी नगर परिषदेचे उंबरठे झिजवत आहे.तर दुसरीकडे न प तुमसर येथे भाजप ची एक हाती सत्ता असल्याने केंद्र सरकार चे अपयश लपविण्यासाठी राज्य शासनाकडूनच घरकुल करीता निधी मिळत नसल्याचे लाभार्थ्यांना सांगून त्यांची दिशा भूल करण्याचे षडयंत्र येथील पदाधिकारी करीत आहेत हे अशोभनीय आहे.
कोट
राज्य सरकारकडून त्या घरकुलासाठी चा संपूर्ण निधी देण्यात आले परंतु न प पदाधिकारी लाभार्थ्यांना खोटी माहिती देऊन राजकारण करीत आहेत असे घाणेरडे राजकारण करण्यापेक्षा लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतांना कुणीही दिसत नाही ही शोकांतिका आहे.घरकुल लाभार्थ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरून जनते समोर सत्य उजेडात आणणार.
अभिषेक कारेमोरे
माजी नगराध्यक्ष तुमसर