संजय साठवणे।ऑनलाईन लोकमतसाकोली : घरी आनंदाचे वातावरण. घरी मंडप, पाहुण्यांची रेलचेल अशा या आनंदाच्या वातावरणात अचानक दु:ख कोसळले. सायंकाळी नातवाचे लग्न असताना आजोबावर काळाने झडप घातली.ही घटना साकोली तालुक्यातील रेगेंपार (सातलवाडा) येथे गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. शामलाल बिसेन (६५) असे मृतकाचे नाव आहे.शामलाल बिसेन यांचा नातु टेकेट्ट हेमराज बिसेन यांचा गुरवारला सायंकाळी गोरेगांव तालुक्यातील झाजीया येथील मुलीशी लग्न ठरले होते.बुधवारी मंडप पुजन झाले. मात्र गुरूवारी १२ वाजताच्या सुमारास आजोबा शामलाल यांचे निधन झाले. आनंदाच्या वातावरण ऐनवेळी क्षणात दु:खात परिवर्तीत झाले. आता काय करायचे असा प्रश्न बिसेन कुटुंबियांसमोर पडला.मात्र लग्न आधीच ठरलेले, अंगाला हळद लागलेली असल्यामुळे बिसेन कुंटुंबियांनी दुपारीच आजोबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आटोपले. त्यानंतर सायंकाळी नातवाचे लग्न विधी पार पाडण्यात आला. नातवाच्या लग्नाच्या दिवशीच आजोबाच्या मृत्यूचा दुर्देवी प्रसंग सर्वांच्याच आठवणीचा ठरला.
दुपारी आजोबावर अंत्यसंस्कार, सायंकाळी नातवाचे लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 1:10 AM
घरी आनंदाचे वातावरण. घरी मंडप, पाहुण्यांची रेलचेल अशा या आनंदाच्या वातावरणात अचानक दु:ख कोसळले. सायंकाळी नातवाचे लग्न असताना आजोबावर काळाने झडप घातली.
ठळक मुद्देआनंदावर दु:खाचे विरजण : साकोली तालुक्यातील रेंगेपार येथील घटना