देवानंद नंदेश्वर भंडाराटँकरमुक्त घोषित भंडारा जिल्ह्यातील ७० गावांमध्ये पाणीटंचाईचे भीषण सावट आहे. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या पाणीटंचाई सदृश्य आराखडांतर्गत कामे मे महिना संपूणही पूर्ण झालेली नाही. परिणामी त्याचा फटका जनसामान्यांना बसत आहे.उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या निरीक्षणानुसार जिल्ह्यातील नऊ लघु पाणलोट विहिरींच्या पातळीत एक ते दोन मीटरने घटली असल्याची बाब उघडकीला आली आहे. भूजलाच्या स्थिर पाण्याच्या पातळीचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने जिल्ह्याची २५ पाणलोट क्षेत्रात विभागणी केली होती. त्यानुसार हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मागील वर्षी जून ते मार्चपर्यंत ९९७.३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ३३२.८३ मिमी पाऊस कमी पडला आहे. याउपर पाणीटंचाईची संबंधी कामेही प्रलंबित आहेत. मार्च महिन्याच्या अहवालात ६६ गावांमध्ये पाणी टंचाई भासण्याचा गंभीर इशारा देण्यात आला होता. त्यात अजुन काही गावांची भर पडली. जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ ५़ ६८ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ मागील हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात २२.०४ टक्क्यानी घट झालेली आहे. लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ या प्रकल्पात केवळ ६़ ५९ टक्के जलसाठा आहे. सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी ६़९२, बघेडा १८़१६, बेटेकर बोथली आणि सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा निरंक आहे़जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ४.५६ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ६.५१ टक्के आहे़ गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे़ असे असले तरी शहरातील नागरीकांना पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे.जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ ६़९१५ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षी दि़ १ जून २०१४ रोजी ६३ प्रकल्पात ३३.७५४ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता़ त्याची टक्केवारी २७.७२ एवढी होती.सन २०१२ मध्ये १०.४, सन २०१३ मध्ये १०.२२ टक्के जलसाठ्याची नोंद आहे. यावर्षी जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. २१ प्रकल्प कोरडेमागील वर्षीच्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. प्रकल्पात असलेल्या पाण्याचा योग्य वापर न करता अपव्यय अधिक झाला. परीणामी जिल्ह्यातील २१ प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे. दोन मध्यम, १२ लघु, तर नऊ माजी मालगुजारी, असे एकुण २३ प्रकल्पांचा समावेश आहे. २१ प्रकल्पांमध्ये बेटेकर बोथली, सोरणा, पवनारखारी, डोंगरला, हिवरा, आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, कुंभली, सालेबर्डी, मुरमाडी हमेशा, न्याहारवानी, सानगडी, केसलवाडा, कन्हेरी, चान्ना, डोंगरगाव, एकलाझरी, जांभोरा, कोका, दहेगावचा समावेश आहे.
७० गावांत भीषण पाणीटंचाईचे सावट
By admin | Published: June 04, 2015 12:27 AM