जिल्हा पणन अधिकारी यांच्या पत्रानुसार रब्बी हंगाम २०२०-२१ मध्ये रब्बीचे धान सरकारी आधारभूत किमतीने सोसायटीमध्ये विकण्यासाठी त्यांच्या सात-बाराची नोंदणी ३१ मेपर्यंत करावयाची आहे. धानाची विक्री ३० जून या कालावधीत केंद्रावर करावयाची आहे. ज्या शेतकऱ्यांचे सात-बारा ३१ मेदरम्यान ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाले असेल, त्यांनाच सरकारी धान खरेदी केंद्रावर धान विकता येईल. ज्यांचे ऑनलाईन ३१ मेपर्यंत झाले नसल्यास, ते सरकारी आधारभूत किमतीवर धान विकू शकणार नाहीत, असे आदेश आहेत. मे महिना संपायला काहीच दिवस शिल्लक असल्याने शेतकऱ्यांची नोंदणीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे. शासनाने लॉकडाऊन लावला असून, फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळा, असे वेळोवेळी सांगूनही त्याचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. नोंदणीकरिता मुदत वाढवून देण्याची मागणी विजय बहेकार यांनी केली आहे.
सोसायटीत फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:37 AM