शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

सौंदर्यीकरणाच्या नावाखाली जीवाशी खेळ

By admin | Published: May 17, 2017 12:26 AM

शहरातील प्रसिद्ध खांब तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे.

खांबतलावाचे बांधकाम : जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील प्रसिद्ध खांब तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. मात्र तलावाच्या सुरक्षा भिंतींच्या बांधकामात वाहतुकीच्या दृष्टीने तिळमात्रही विचार करण्यात आलेला नाही. मनमानी कारभारामुळे लोकांना प्रचंड अव्यवस्थेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे सुरु असलेले सदोष बांधकाम थांबवून खांबतलाव सौदंर्यीकरणाची चौकशी करण्यात यावी तसेच राज्य महामार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी पदवीधर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र निंबार्ते यांनी केली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना देण्यात आले आहे.स्थानिक शितला माता मंदिर ते बालपूरी मंदिर पर्यंतचा रस्ता अत्यंत वळणाचा व वर्दळीचा असून त्यामानाने अतिशय अरुंद आहे. सदर रस्त्याची मांडणी बघता खांब तलावाच्या तटरक्षक भिंतीमुळे वाहनचालकांना समोरुन येणारे वाहन दृष्टिपथास पडत नसल्यामुळे अनेक अपघात या रस्त्यावर झाले, परिणामी अनेकांचे जीवही गेले.सध्या खांब तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. परंतु सदर कामाचे नियोजन हे सदोष असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून येत आहे. या कामाचे नियोजन करतांना त्यापुढील रस्त्यावरची वाहतुक सुरळीत व्हावी, याचा विचार करता आला असता परंतु जास्तीत जास्त जागा खाजगी कामासाठी उपयोगात कशी आणता येईल, याचाच विचार करण्यात आल्याचे सदर नियोजनातून दिसून येते. भंडारा शहराचा विचार केला तर खांबतलाव हे भंडारा शहरातील पुरातन आध्यात्मिक वैभव आहे. ते टिकविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न व्हायला पाहिजे होते. मात्र खांबतलावावर अवलंबून असलेल्या जवळपास १५ ते २० कोळी बांधवांच्या परिवाराचा विचार न करता सौंदर्यीकरणाचे काम जोरात सुरु आहे. येथे वापरण्यात येणाऱ्या निधीतुन शहरात विविध ठिकाणी नागरिकांसाठी उद्याणे विकसित करता येवू शकतात व ते नागरिकांच्या सोयीकरिता योग्य होईल. असे असतांना इतका मोठा निधी एकाच ठिकाणी उद्यानासाठी उपयोगात आणून नगर परिषद प्रशासनाला नेमके काय साध्य करायचे आहे हा संशोधनाचा विषय आहे. सदर ठिकाणी उद्यान बनवितांना खासगी गाळे काढण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. शहरात सांडपाणी व पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असतांना केवळ बांधकामाकडे लक्ष दिल्या जात आहे. खाजगी गाळे निर्मितीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिग उत्पन्न होऊन सदर तलावात प्रदूषण होणार आहे. भंडारा शहराचे प्राचीन वैभव टिकविण्यासाठी व वाहतुक सुरळीत होऊन जनतेचे प्राण वाचविण्याच्या दृष्टीने याचे पुन:श्च नियोजन व्हावे व सध्या सुरु असलेले सदोष बांधकाम थांबवून खांबतलाव सौंदर्यीकरणाची चौकशी करण्यात यावी, राज्य महामार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी महेंद्र निंबार्ते यांनी केली आहे.