श्रीगणेश आरती व प्रसाद वितरणानंतर मंडळाच्या वतीने महाप्रसाद आयोजित केला गेला. या वेळी भंडारा वारकरी मंडळाचे अध्यक्ष डाॅ. संजय एकापुरे, कार्याध्यक्ष रमाकांत पशिने, सचिव प्रसन्न महाजन तसेच कोषाध्यक्ष दत्तू वानखेडे व लक्ष्मण वानखेडे, प्रदीप मानापुरे व राष्ट्रहित वर्धक समाज गणेश मंडळाचे नगरसेवक रजनिश (बंटी) मिश्रा, पिंटू राऊत, रवी कडव, प्रशांत डोमळे, हरी गाते, कृष्णा गाते, राजेश गाते, प्रशांते शेंडे, राघव सार्वे व सर्व सदस्य उपस्थित होते़
भंडारा वारकरी मंडळाच्या वतीने गणेशोत्सवादरम्यान विविध सदस्यांकडे श्री गणपती अथर्वशीर्ष पाठ व हनुमान चालिसा पठणाचे कार्यक्रम संपन्न झाले़ त्याअंतर्गतच गणेश यागाचे आयोजन करण्यात आले होते. भंडारा नगरात वारकरी मंडळाच्या वतीने होणाऱ्या कार्यक्रमाचे एक आध्यात्मिक व पारमार्थिक वातावरण निर्मिती झाली. कोरोना महामारीच्या सावटातून बाहेर पडू लागलेल्या जनसामान्यांना धार्मिक कार्यक्रमामुळे एक उत्साही वातावरण तयार होण्यास मदत होत आहे़ गणेश यज्ञ कार्यक्रमाला देशबंधू वॉर्डातील व परिसरातील भाविकांनी हजेरी लावली़ कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रहितवर्धक समाज गणेश मंदिरच्या सर्व महिला मंडळांनी परिश्रम घेतले़