भंडारा पंचायत समितीतील पहिली ग्रामपंचायत : पदाधिकारी, कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचेही सहकार्यभंडारा : ‘गाव करी ते राव ना करी’ या उक्तीप्रमाणे गणेशपूर ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनीच नव्हे तर पदाधिकाऱ्यांनीही ‘एक मेका सहाय्य करू...’ यानुसार काम करून ग्रामपंचायतीला एका शिखरावर पोहचविले. ग्रामपंचायत प्रशासनाने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल म्हणून आयएसओ मानांकन प्राप्त झाले. भंडारा शहरालगत असलेल्या सुमारे १५ हजार लोकवस्तीच्या गणेशपूर ग्रामपंचायतीने शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून ग्रामस्थांना योजनांचा लाभ दिला आहे. लोकाभिमुख प्रशासन व उत्तम नागरी सुविधा यामुळे गणेशपूर ग्रामपंचायतीला प्रशासनात चांगली ओळख आहे. २००५ ते आजतागायत शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी केल्यामुळे सुमारे ३२ लाखांचे पारितोषिक ग्रामपंचायतीने पटकाविले आहे. या ग्रामपंचायतमध्ये कार्यरत ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी यांच्याकडून ग्रामस्थांना वेळोवेळी सहकार्य करण्यात येते. ग्रामपंचायतची इमारत अद्ययावत असून कामकाजात पारदर्शकता आहे. भंडारा जिल्ह्यात आयएसओ प्राप्त करणारी गणेशपूर ग्रामपंचायत ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. नियोजनबद्ध कामे आणि कार्यतत्पर्ता यामुळेच या ग्रामपंचायतीचे यासाठी निवड करण्यात आली. ग्रामपंचायतच्या उल्लेखनीय कामात ग्रामविकास अधिकारी एस. बी. चिंधालोरे, उपसरपंच यशवंत सोनकुसरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांच्यासह भंडारा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रमोद हुमणे, विस्तार अधिकारी भिमगिरी बोदेले यांचा यात महत्वाचा वाटा आहे. (शहर प्रतिनिधी)विविध प्रकारचे उद्दीष्ट समोर ठेवून ग्रामपंचायतीने आयएसओसाठी प्रयत्न केले. यात दस्ताऐवज व ईमारतीचा विशेष विचार करण्यात येतो. यामुळे भौतिक सुविधा सुधारण्यासाठी मदत होते. - मंजुषा ठवकर, संवर्ग विकास अधिकारी, भंडारा.लोकसहभाग व सहकार्यातून ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. यात पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले असून ते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करू.- वनिता भुरे, सरपंच गणेशपूर.सामाजिक उपक्रमाची दखलग्रामपंचायती अंतर्गत ग्रामस्थांना सर्व सुखसुविधा पुरविल्या जात आहे. सोबतच शैक्षणिक, आरोग्य, पाणीपुरवठा, प्रशिक्षण, जनावरांची काळजी, विकास कामे, लघुसिंचनाची व्यवस्था, आर्थिक व नियोजन, सामाजिक दायीत्व, शेती विषयक माहिती, महिला व मुलांच्या उन्नतीसाठी प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येते. याची दखल घेण्यात आली.
गणेशपूर ग्रामपंचायतीला ‘आयएसओ’ मानांकन
By admin | Published: May 08, 2016 12:31 AM