लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : अलीशन कारमधून शेळ्या चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पकडून नागरिकांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली करण्याची घटना शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता तालुक्यातील देव्हाडी येथे घडली. चोरटे वर्धा जिल्ह्यातील आणि छत्तीसगड राज्यातील आहे.गजानन विठ्ठल ठाकरे (३५) रा. अडेगाव जि. वर्धा, पिंकू आशिया चतुर्वेदी (२९) रा. भिलाई, डी.ओ. झेवियर (६०) रा. भिलाई (छत्तीसगड) अशी चोरट्यांची नावे आहे. हे तीघेही फोर्ड कारमधून (क्रमांक सीजी ०४ डीपी ४४११) शुक्रवारी सकाळी देव्हाडी येथे आले. बाजार चौकात त्यांनी वाहन थांबविले. बाजार परिसरात असलेले दोन शेळ्या उचलून चक्क आपल्या कारमध्ये कोंबल्या. त्यावेळी शेळ्या जोराने ओरडल्या त्यामुळे नागरिकांचे लक्ष घटनेकडे गेले. नागरिकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कारसह पळून गेले. काही नागरिकांनी कारचा पाठलाग करून त्यांना पकडले. तिघांनाही बाहेर काढून बेदम चोप दिला. या घटनेची माहिती देव्हाडी पोलिसांना देण्यात आली. देव्हाडी पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल केले आहे. या घटनेची तक्रार गणेश पारधी यांनी दिली आहे.अलिशान कारमधून शेळ्या चोरणारी टोळी जेरबंद झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दिवसा रेकी करून रात्री मोठा दरोडा टाकण्याचा तयारी तर ही टोळी नव्हती ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आलिशान कारमधून शेळ्या चोरणारी टोळी देव्हाडीत जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 9:41 PM
अलीशन कारमधून शेळ्या चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पकडून नागरिकांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली करण्याची घटना शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता तालुक्यातील देव्हाडी येथे घडली. चोरटे वर्धा जिल्ह्यातील आणि छत्तीसगड राज्यातील आहे.
ठळक मुद्देगावकऱ्यांनी दिला चोप : चोरटे वर्धा आणि छत्तीसगडमधील