शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

एटीएमद्वारे फसवणूक करणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:44 PM

एटीएमचा पासवर्ड बदलवित असताना मदतीच्या बहाण्याने हस्तक्षेप करुन पासवर्ड जाणून घेत मुख्याध्यापिकेची तब्बल तीन लाख ६८ हजार ८८२ रुपयांनी फसवणूक करणाऱ्या ....

आॅनलाईन लोकमतसाकोली : एटीएमचा पासवर्ड बदलवित असताना मदतीच्या बहाण्याने हस्तक्षेप करुन पासवर्ड जाणून घेत मुख्याध्यापिकेची तब्बल तीन लाख ६८ हजार ८८२ रुपयांनी फसवणूक करणाऱ्या चार आरोपींना साकोली पोलिसांना गजाआड करण्यात यश आले आहे.संदीपकुमार गजेसिंग (२८), प्रवीणकुमार गजसिंग (२४), सूरजमल तेलूराम (४०), रणवीरसिंह ग्यानीराम (४५) अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून ९८ हजार रुपये जप्त करण्यात आले. हे चौघेही सराईत गुन्हेगार असून एटीएममध्ये येणाऱ्या लोकांना गाठून त्यांची फसवणूक करण्याचे काम अनेक वर्षापासून करीत आहेत.पोलिसांनी फसवणूक, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन तपासकार्य सुरु केले. सदर एटीएम सेंटरमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजवरुन या तिन्ही आरोपींची छायाचित्रे प्राप्त झाली.त्यावरुन पोलिसांना या तरुणांचा माग काढणे सोपी गेले. साकोली पोलिसांनी सतत १४ दिवस तपासाची चक्रे वेगाने फिरवली. छत्तीसगढ पोलिसांनी दुर्ग येथे या तिन्ही आरोपींना गजाआड केले. बनावट एटीएमकार्ड तयार करुन फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लावल्याने या घटनेतील आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.या कारवाईत पोलिस निरीक्षक रामेश्वर पिपरेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर वर्मा, किशोर मेश्राम यांच्यासह पोलिस निरीक्षक सुधीर वर्मा, किशोर मेश्राम यांनी सहभाग घेतला.शिताफीने बदलविले होते एटीएमआशा बोरकर (४४) रा. प्रगती कॉलनी या एकोडी येथे कामाई करंजेकर विद्यालयात मुख्याध्यापिका आहेत. त्यांना मिळालेल्या नवीन एटीएम कार्डच्या पासवर्डमध्ये बदल करण्यासाठी त्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये गेल्या. पासवर्डमध्ये बदल करीत असताना या तरुणांनी मदत करण्याच्या बहाणा केला. बोरकर यांच्याकडील एटीएम कार्ड बदली करुन शिताफीने पासवर्ड चोरी केला. परराज्यातील एटीएम मशीनमधून बोरकर यांच्या खात्यातील रक्कम दुसऱ्या बँक खात्यावर वळविली.