देवानंद नंदेश्वर
भंडारा : अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक लोहीत मतानीयांच्या अध्यक्षतेखाली पोलिस परेड पटांगणावर अमली पदार्थ नष्ट करण्यात आले.
२०१३ ते २०२१ पर्यत भंडारा जिल्ह्यात दाखल असलेल्या गुन्ह्यापैकी न्यायालयाने निपटारा केलेल्या एकुण १६ गुन्ह्यातील ३९ लाख ६१ हजार ३६८ रुपये किमतीच्या ३९४.८३५ किलो गांजासह २९.५७९ ब्राऊन शुगरचा समावेश आहे. एकुण १६ गुन्ह्यांपैकी १० गुन्हे हे गांजाबाबत आहेत तर, उर्वरीत सहा गुन्हे ब्राऊन शुगरचे आहेत. अमली पदार्थ नाश करण्याकरिता चार सदस्यीय समीती गठीत करण्यात आली. यात पोलीस अधीक्षक अध्यक्ष लोहीत मतानी आहेत. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधीकारी डॉ. अशोक बागुल व पोलीस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर सदस्य आहेत. ही कार्यवाही अतीरीक्त सत्र न्यायाधीश पी. डी. खुने, तहसीलदार अरविंद हिंगे, वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक एम. डी. तोंडरे, प्रदूषण मंडळाचे अमर मुनेश्वर, दोन सरकारी पंच वनपाल हेमंत बांगडकर, वनमजूर नितीन गणवीर यांच्या निरीक्षणात हवालदार, नितीन शिवनकर, प्रदीप डाहारे, रमेश बेदुरकर यांनी केली.