घेतले उत्पादनप्रशांत देसाई।आॅनलाईन लोकमतभंडारा : मागील चार वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे येत्या कालावधीत जिल्ह्यात जलस्त्रोतात मोठी घट निर्माण होणार. यामुळे प्रशासनाने आताच यावर उपाययोजना करण्याचा आराखडा तयार केला आहे. अशा स्थितीत शेतात घेतलेल्या पिकांनाही पाण्याचे प्रमाण अधिक लागते. त्यामुळे अल्प पाण्यात जास्त उत्पादन घेण्यासाठी बंडू बारापात्रे यांनी डोंगर पायथ्याशी असलेल्या त्यांच्या शेतात पपईची बाग फुलविली आहे.मोहाडी तालुक्यातील डोंगरदेव गावात डोंगराच्या पायथ्याशी त्यांची शेती आहे. २८ एकराच्या शेतात त्यांनी विविध प्रकारची शेती करून शेतकºयांसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे. २८ एकरापैकी अडीच एकरात त्यांनी पपईची बाग फुलविली असून एका झाडाला अनेक पपई लागल्या असून त्या सर्वांचे वजन अंदाजे ५० ते ६० किलोचे आहे.काळ्या मातीशी एकनिष्ठता टिकविल्यास कोणतेही पीक किंवा फळबाग उत्पादित करणे कठीण नाही. मनात जिद्द व परिश्रमाची तयारी असेल तिथे कठीण प्रसंगीही लिलया मात करता येते. असाच काहीसा नवा प्रयोग जिल्ह्यातील शेतकºयांसमोर बंडू बारापात्रे यांनी आणला आहे. भंडारा शहरातील भाजी व्यापाºयाचे थोक व्यापारी असलेल्या बंडू यांनी त्यांच्या शेतात नवनवीन प्रयोग केले आहेत. स्वत:सह अन्य शेतकºयांनीही त्यांनी मार्गदर्शन करून नवीन प्रयोग करुन शेती पिकविली आहे.सुपिक जमिनीत श्रम गाळून पीक घेणे कठीण नाही. मात्र डोंगराळ, उंच सखल जमिनीत असा प्रयोग करण्यात पुढाकार घेणे हाच आदर्श ठरला आहे. भाजीपाला व पारंपारिक पिकांना फाटा देत कमी पाण्यात जास्त मोबदल्याची शेती करण्यावर बारापात्रे यांनी भर दिला आहे. त्यांनी केलेल्या शेतीचे मार्गदर्शन घेण्याकरिता कृषी विभागाच्या अधिकाºयांसह शेतकरीही शेताला भेट देत आहेत. शेतीत पपई पिकाच्या लागवडसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काशिनाथ तरकसे, कृषी तज्ज्ञ सुधीर धकाते आदींचे त्यांना मार्गदर्शन लाभले आहे.तीन वर्षापर्यंत मिळणार लाभपपई हे तीन वर्षापर्यंत उत्पादन देणारे फळझाड आहे. एकदा लागवड केली की, झाड मोठे होईपर्यंत म्हणजे चार पाच महिन्यापर्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. सहा बाय सहा फुट अंतराने या वृक्षांची लागवड केलेली आहे. पपईची मागणी भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असल्याने व येथे बागायती शेती कमी असल्याने बारापात्रे यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला.एका झाडाला ५० किलोचे उत्पादननांदेड येथून या पपईचे रोप आयात करण्यात आले. एका वृक्षासाठी २० रुपयांचा खर्च आला. अडीच एकरामध्ये सुमारे अडीच हजार झाडे लावण्यात आली व ती आता योग्य मशागतीने पपईची बाग बहरली आहे. शेतातील एका झाडाला लागलेल्या सर्व पपर्इंचे वजन जवळपास ५० ते ६० किलोच्या घरात आहे. कमी पाण्यात अधिकमोबदल्याचे पीक ठरले आहे.पारंपारिक पिकासह नाविण्यपूर्ण शेती प्रयोग करण्याच्या जिज्ञासेने पपईची बाग फुलविली. केलेल्या प्रयत्नाला फळ आले असून यासाठी ठिंबक सिंचनाचा वापर करण्यात आला. जून महिन्यात पपई विक्रीयोग्य होईल. या शेतीतून मोठे आर्थिक उत्पन्न प्राप्त होईल. शेतकºयांनी नैराश्येला बाजूला सारुन नाविण्यपूर्ण प्रयोग करून आर्थिक स्थिती सुधारावी.-बंडू बारापात्रे, प्रगतीशिल शेतकरी, भंडारा.
डोंगरपायथ्याशी फुलली अडीच एकरात ‘पपई’ची बाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 9:53 PM
मागील चार वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे येत्या कालावधीत जिल्ह्यात जलस्त्रोतात मोठी घट निर्माण होणार. यामुळे प्रशासनाने आताच यावर उपाययोजना करण्याचा आराखडा तयार केला आहे.
ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान : बंडू बारापात्रे यांचा यशस्वी प्रयोग, लाखोंचा होणार आर्थिक लाभ, कमी पाण्यात