शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
"अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
6
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
7
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
8
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
9
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
10
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
11
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
12
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
13
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
14
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
15
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
16
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
17
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
18
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
19
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
20
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं

गर्रा बघेडा पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणार

By admin | Published: January 01, 2015 10:56 PM

गर्रा बघेडा हे गाव जंगल व डोंगरांनी व्याप्त असल्याने गावकऱ्यांची तयारी असल्यास या गावाला ग्रामीण पर्यटनासाठी विकसित करणार. जलाशयाचे खोलीकरण करून विविध जल क्रीडा,

नाना पटोले : आढावा बैठकीत गावाच्या विकासावर चर्चाभंडारा : गर्रा बघेडा हे गाव जंगल व डोंगरांनी व्याप्त असल्याने गावकऱ्यांची तयारी असल्यास या गावाला ग्रामीण पर्यटनासाठी विकसित करणार. जलाशयाचे खोलीकरण करून विविध जल क्रीडा, जवळील जंगलात व टेकडीवर ट्रेकींग, पॅरारायडींग व तत्सम आधुनिक क्रीडा प्रकारासाठी सुविधा उपलब्ध करून गावाला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येईल. म्हणजे येथील ग्रामस्थांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे आश्वासन खासदार नाना पटोले यांनी दिले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून अस्तित्वात आलेली सांसद आदर्श ग्रामयोजनेची अंमलबजावणी करण्याकरिता खा.नाना पटोले यांनी जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांचे समवेत विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आदर्श ग्राम गर्रा - बघेडा येथे गावाच्या विकास कामासंबंधी नुकतीच आढावा बैठक घेतली. बावनथडीचे पाणी या गावाच्या १५० हे.आर. शेत जमिनीला त्वरीत सोडण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दारिद्र्य रेषेखाली कुटुंबांना त्वरीत विद्युत कनेक्शन देण्याचे निर्देश खा.पटोले यांनी दिले. दुग्ध विकास अधिकाऱ्यांना गावात १ हजार लिटरचे होत असलेले दुग्ध उत्पादन वाढवून या गावात दुग्ध संकलनासाठी त्वरीत दुग्ध सहकारी संस्था स्थापन करावे. तसेच पशु संवर्धन अधिकाऱ्यांना गावातील जनावरांचा विमा काढून तयंच्या करीता संवर्धन करण्यास सांगितले. त्यासंबंधी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश व ते मंजूर करण्याचे आश्वासन खा.पटोले यांनी दिले. जंगलातील मोहाची व चारोळीच्या वृक्षांची जतन करावे. तसेच तेंदूपत्ता मजूरांचा प्रलंबित बोनस त्वरीत वाटप करावे. गावातील जल संवर्धनासाठी विविध पाणी साठवण तलाव, बंधारे, कोल्हापूरी बंधारे यांची दुरुस्ती व गाळ काढण्यात यावे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना त्वरीत क्रीडा संकुल व व्यायामशाळेसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी, बांधकामाचे प्रस्ताव, गं्रथालय विभागाला अत्याधुनिक ग्रंथालय व विद्यार्थ्यांसाठी अभ्यासकक्ष बांधण्यासाठी प्रस्ताव तसेच ग्रामविकास यंत्रणा, प्रकल्प अधिकाऱ्यांना महिला व पुरुष बचत गटांना लघु उद्योग सुरु करण्यासाठी मार्गदर्शन व निधी उपलब्ध करून द्यावे, तसेच तहसीलदारांनी समाधान शिबिरासारखे तत्सम शिबिर लावून गावकऱ्यांचे राशन कार्ड नुतनीकरण, नवीन राशन कार्ड, विभक्तीकरण, संजय गांधी निराधार योजना, वृद्धापकाळ योजना व तत्सम योजनासंबंधी आर्थिक सहाय्य योजनांचा लाभ गावातच येवून देण्याचे निर्देश खा.पटले यांनी दिले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रमेश पारधी, तुमसर पंचायत समितीचे सभापती कलाम शेख, जि.प. सदस्य अशोक उके, रहांगडाले, खंडविकास अधिकारी, तहसीलदार, सरपंच तरटे यांच्यासह सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)