लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दैनंदिन वापरात गरजेची वस्तु ठरलेल्या सिलिंडरच्या दराचा भडका पुन्हा झाला आहे. सप्टेंबर महिन्यात ८८१ रूपयाला (सबसिडीसहीत) मिळणारा सिलिंडर आॅक्टोबर महिन्यात चक्क ९४० रूपये मोजून मिळणार आहे.महागाईचा फटका जनसामान्यांना बसत असून पेट्रोल व डिझेलनंतर सिलिंडरच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. सिलिंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट चांगलेच डगमगले आहेत.मागील दोन महिन्यांपासून महागाईच्या विळख्याने नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या दरामुळे वाहतुकीचा खर्चही वाढत आहे. यावर वेळीच तोडगा न निघाल्यास जनआंदालन होईल यात तिळमात्र शंका नाही. घरगुती वापराचे पाच किलो सिलिंडर सबसिडीसह ३४१ रूपयांचा तर सबसिडीविना तेच सिलिंडर ५०७ रूपयांना मिळणार आहे. १९ किलोचे सिलिंडर १६१६.५० रूपयांनी मिळणार आहे.वाढत्या सिलिंडरच्या दरामुळे ग्राहकही वारंवार विचारणा करित आहे. दुसरीकडे सिलिंडरचे दर वाढल्यामुळे याची खपत कमी होईल तर अन्य इंधन वस्तुंची मागणी वाढू शकते. परिणामी पर्यावरण असंतुलन होण्यासही ही बाब कारणीभूत ठरू शकते.-डी.एफ. कोचे,संचालक, गॅस एजंसी भंडारा.
गॅस सिलिंडर @ ९४०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 9:44 PM
दैनंदिन वापरात गरजेची वस्तु ठरलेल्या सिलिंडरच्या दराचा भडका पुन्हा झाला आहे. सप्टेंबर महिन्यात ८८१ रूपयाला (सबसिडीसहीत) मिळणारा सिलिंडर आॅक्टोबर महिन्यात चक्क ९४० रूपये मोजून मिळणार आहे. महागाईचा फटका जनसामान्यांना बसत असून पेट्रोल व डिझेलनंतर सिलिंडरच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. सिलिंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट चांगलेच डगमगले आहेत.
ठळक मुद्देमहागाईचा फटका : बजेट कोलमडले