वाहतुकीचा खर्च जास्त : नागरिकांची सुयोग्य अंमलबजावणीची मागणी कोंढा (कोसरा) : कोंढा येथे गॅस ग्राहकाकडून प्रति सिलेंडर ७०० रूपये घेतले जात असल्याने ंही ग्राहकांची लूट थांबविण्याची मागणी गॅसधारकांनी केली आहे. कोंढा (कोसरा) येथे आठवड्यातून २ दिवस पवनी येथील भावना इंडेन गॅस एजन्सीद्वारे गॅस ग्राहकांना सिलिंडर पुरवठा केला जातो. शासनाच्या नियमाप्रमाणे ६६५ रूपये प्रति सिलिंडर असताना येथे सर्वांकडून ७०० रूपये घेतले जात असल्याने ही ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आधीच केंद्र शासनाने सिलिंडरच्या किंमतीत वाढ केल्याने सामान्य लोकांचे बजेट कोलमडले आहे. गरीबाला उज्वल योजनेत कनेक्शन मिळते. पण सिलिंडर खरेदी करताना ७०० रूपये कोठून आणावे, असा प्रश्न पडला आहे. ६६५ रूपये किंमतीचे सिलिंडर ७०० रूपयात मिळते ते देखिल ग्राहकांना सिलिंडर घरपोच मिळत नाही. सिलेंडरसाठी मेनरोडवर किंवा गावातील रस्त्यावर खाली सिलेंडर घेवून उभे राहावे लागते. ग्राहकांना ६६५ रूपयाची पावती मिळते आणि उर्वरित ३५ रूपये वाहतुकीचा खर्च म्हणून घेतला जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. काही ग्राहकांना चिल्लर १० रूपये परत केले जाते. अशाप्रकारे कोणाकडून ६९० तर कोणाकडून ७०० रूपये घेतले जात आहे. पवनी ते कोंढा सिलेंडर वाहतुकीचा खर्च एका ग्राहकाकडून २० रूपये घेतले तरी खुप होते. त्यापेक्षा जास्त घेतल्याने ही ग्राहकांची लुट आहे. तसेच गॅस एजन्सीचे कोंढा येथे येणारे कर्मचारी ग्राहकांसी अरेरावी पद्धतीने वागतात तरी कोंढा कोसरा येथे प्रत्येक ग्राहकांना घरोघरी सिलेंडर पोहचवून देणे, वाहतुकीचा खर्च प्रत्येक सिलेंडरमागे २० घ्यावे, अशी मागणी ग्राहकांनी केली असून ग्राहकांची होत असलेली लुट थांबविण्यात यावे, अशी मागणी गॅस ग्राहकांनी केले आहे. या संबंधात भावना इंडियन गॅस एजन्सीचे मालक रामलाल तलमले यांचेसी संपर्क केले असता त्यांनी वाहतुकीचा खर्च घेण्याचे जिल्हाधिकारी भंडारा यांचे आदेश आहेत. प्रत्येक किलोमीटर मागे २ रूपये घेण्याचे आदेश आहेत. त्यानुसार कोंढा ते पवनी येणे जाणे २४ कि़मी. अंतर होते. त्यामुळे एका सिलेंडरसाठी वाहतूक खर्च २५ रूपये घेत असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
कोंढा येथे गॅस ग्राहकांची लूट!
By admin | Published: January 02, 2017 1:31 AM