निर्माणाधीन गेटचे ‘गौतम बुद्ध द्वार’ असे नामकरण १९५४ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण दिलेल्या कुऱ्हाडा तलावाचे पाळीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व तलावाला ‘भीम सरोवर’ असे नाव देण्यात यावे, बाल समुद्र तलावात ५० मीटर लांबीचा पूल बांधून स्व. मयूर गुरुजी यांचे जुने घर ते जगन्नाथ मंदिराचे बाजूने असणाऱ्या सिरसाळा- कन्हाळगाव रस्त्याला जोडणारा रस्ता तयार करून बाल समुद्र तलावाचे सौंदर्यात भर घालण्यात यावी. तसेच वैनगंगा नदीवर ऐतिहासिक काळात बांधण्यात आलेल्या दिवानघाट, पानखिडकी व घोडेघाट हे तिन्ही घाट शंभर मीटर अंतरावर असल्याने सर्व दुरुस्त करून एका मार्गाने जोडण्यात यावे. पवनीच्या पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मागण्यांचे निवेदन बुद्धविहार समिती पवनीचे सदस्य विकास राऊत, शैलेश मयूर व प्रेम सूर्यवंशी यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना दिले आहे.
240921\1758-img-20210924-wa0014.jpg
नगर परिषद पवनी चे मुख्याधिकारी यांना निवेदन देतांना बुद्ध विहार समिती चे सदस्य.