: राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा पुढाकार
भंडारा : ओबीसी महामंडळांतर्गत व्याज परतावा योजनेमध्ये घोळ झाल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री यांना निवेदन देत ही समस्या तत्काळ निकाली काढावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ओबीसी महामंडळांतर्गत व्याज परतावा योजनेमध्ये लाभार्थ्यांना त्यांचा लाभ मिळालेला नाही. या योजनेअंतर्गत सॉफ्टवेअरमध्ये अडचणी निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. त्यासोबतच गत वर्षभरापासून या व्याज परताव्याचे कुठलेही व्याज संबंधित लाभार्थ्यांना मिळालेले नाही. अण्णासाहेब पाटील व्याज परतावा योजनेचे नियम ओबीसी महामंडळालासुद्धा लागू करण्यात यावेत, अशी बाब गृहीत धरली जाणे योग्य आहे. याठिकाणी बँकेतर्फे व्याजाची रक्कम ठरवून दिली आहे, ती त्यांना परत देण्याची सोय असली पाहिजे, अशी बाबही ओबीसी महासंघाने दिलेल्या निवेदनात नमूद केली आहे. सदर योजना अण्णासाहेब पाटील योजनाअंतर्गत पद्धतीची असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. गत वर्षभरापासून या लोकांना व्याज परतावा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी कर्ज घेतले आहे. तसेच किस्तही भरले आहेत. मात्र, त्यांना व्याज परतावाच्या रुपाने मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यावर तत्काळ निर्णय घेऊन लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हा शाखा, भंडाराच्या वतीने करण्यात आली आहे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आले आहे. निवेदनात महासंघाचे जिल्हा संयोजक मुकेश पुडके यांच्यासह के. झेड. शेंडे, मुरलीधर भर्रे, माधवराव फसाटे, उमराव सेलोकर, गौरीशंकर पलांदुरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.