लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर लवकरच ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरु होत आहे़ यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील सरपंचांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सरकारनेही या योजनेची विशेष दखल घेतली आहे.बदलत्या गावगाड्याची नोंद घेणारा व बदलू पाहणाऱ्या गावखेड्यांना प्रेरणा देणारा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ हा बीकेटी टायर्स प्रस्तुत व पतंजली आयुर्वेद प्रायोजित ऐतिहासिक पुरस्कार ‘लोकमत’ने गत वर्षापासून सुरु केला आहे.राज्याच्या इतिहासात प्रथमच आदर्श सरपंच निवडून त्यांना गौरविण्यात आले़ यापूर्वी सरपंचांना गौरविणारी पुरस्कार योजना नव्हती.मागील वर्षी अठरा जिल्ह्यात ही योजना राबविण्यात आली. त्यात पाच हजाराहून अधिक सरपंचांनी सहभाग नोंदविला.सरपंचांनी त्यांच्या प्रस्तावात दिलेल्या कामांची तज्ज्ञांच्या समितीमार्फत पाहणी करण्यात येऊन वेगवेगळ्या १३ कॅटेगरीमध्ये अगोदर जिल्हा व नंतर राज्य पातळीवर पुरस्कार देण्यात आले.गत २८ मार्चला मुंबईत राज्यस्तरावरील दिमाखदार सोहळ्यातग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विविध मंत्र्यांच्या हस्ते सरपंचांना गौरविले होते.गावांसाठी २५ लाखांची घोषणागत वर्षीच्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ सोहळ्यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘सरपंच आॅफ द ईअर’ ठरलेल्या सरपंचाच्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये तर विविध गटातील पुरस्कार प्राप्त सरपंचांनी विकास कामांचे प्रस्ताव दिल्यास त्यांच्या ग्रामपंचायतला १० लाख रुपयांचा विकास निधी देण्याची घोषणा केली होती़जिल्हास्तरावर विजेत्या ठरलेल्या सरपंचांच्या ग्रामपंचायतींसाठीही विविध योजनांच्या घोषणा मंत्र्यांनी उत्स्फूर्तपणे केल्या होत्या.अठरा जिल्ह्यांचा समावेशअकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, औरंगाबाद, लातूर, जालना, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या अठरा जिल्ह्यांत गतवर्षी ही योजना राबविण्यात आली. याहीवर्षी या जिल्ह्यांचा समावेश आहे. ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ हा मानाचा पुरस्कार पटकविण्यासाठी अनेक सरपंचांनी विविध योजना राबवत गतवर्षीपासूनच तयारी सुरु केली आहे.
सरपंच अवॉर्डसाठी गावकारभारी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 9:49 PM
गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर लवकरच ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरु होत आहे़ यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील सरपंचांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सरकारनेही या योजनेची विशेष दखल घेतली आहे.
ठळक मुद्दे‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ : दिमाखदार दुसरे पर्व, राज्यातील पहिलीच योजना