लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगा कृषी महोत्सवात विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यात शेतकऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे ते भंडारा पशुसंवर्धन विभागाचा भारतातील महत्त्वाच्या दूध उत्पादन देणाऱ्या देशी गाईचा स्टॉल. यातही विदर्भाची गवळावू जातीची गाय व वळू शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करीत आहे.खरंगणा, वर्धा येथील गावळावू गाईच्या पशू प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावलेली शेतकरी भदराज अरबट यांची गाय व दहेगाव गोंडी, वर्धा येथील रूपराव अरगडे यांचा वळू या महोत्सवात ठेवण्यात आला आहे. गवळावू गाय व वळूला पाहण्यासाठी व त्याची माहिती जाणून घेण्यासाठी शेतकºयांनी गर्दी केली आहे.गवळावू गाय ही वर्धा जिल्ह्यातील असून नागपूर जिल्ह्यात काटोल, नरखेड तसेच मध्यप्रदेशातील नरखेड लगतच्या भागात आहे. या गाई दुधासाठी प्रसिद्ध आहेत. मागील ५० वषापूर्वी गावठी वळूच्या प्रजननामुळे गावळावू गाईची जात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या गाई भविष्यात उपलब्ध होण्याकरीता शासन शेतकºयांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती करून गवळावू गाईचे जतन व संवर्धन करण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी वैनगंगा महोत्सवात गवळावू गाय व वळू ठेवण्यात आला आहे.गवळावू गाय एका वेतात ८०० लिटर दूध देत असून त्यापासून मिळणारे बैल हे शेतीसाठी चपळ व उत्कृष्ट आहेत हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. या प्रदर्शनात देशी गाईच्या विविध जाती ठेवण्यात आल्या आहेत. राजस्थान बिकानेरची राठी, पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेशची साहिवाल, गुजरात काठियावाडची गीर, रेड सिंधी सिंध प्रांत, राजस्थान गुजरातची कोक्रेज या गाईंचा यात प्रामुख्याने समावेश आहे. या जास्त दूध देणाºया गाई आहेत.भंडारा जिल्हा हा तलावाचा जिल्हा असून येथे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने भंडारा जिल्ह्यात बदक पालन चांगल्या पद्धतीने करता येते. त्यासाठी शासनाच्या प्रक्षेत्रावर पैदा होणारे खाकी कॅम्पवेल जातीचे बदक या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. बदक पालन व्यवसायातून स्वयंरोजगाराची निर्मिती होऊ शकते. तसेच शेळ्यांच्या उस्मानाबादी, सिरोही व बकऱ्यांच्या राणी, जमुनापरी व कुर्बाणीसाठी प्रसिद्ध असलेली जात प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. कुक्कुट पालनातील देशी जात कडकनाथ, गिरीराज, वनराज, कॅरी निर्भिक्व ब्रम्हा तसेच ऱ्होड आयर्लंड रेड, ब्लॅक मिनारका व ब्लॅक या विदेशी जातीच्या कोंबड्या ठेवण्यात आल्या आहेत.यासोबतच पशूंचे स्वास्थ्य चांगले राहण्याकरिता व दूध उत्पादन आणि प्रजनन क्षमता वाढण्याकरिता विविध जातीचे वैरण ठेवण्यात आले असून पशुसंवर्धन विभागाने वैरण लागवडीची पद्धत विकसीत केली आहे. या व्यतिरिक्त दूध काढण्याची मशीन दूध संकलनातील फॅट, एस.एन.एफ व पाणी ओळखण्याची मशीन या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. या स्टॉलला शेतकरी मोठ्या संख्येने भेट देत आहेत.गवळावू गाईचे दूध हे अत्यंत पौष्टिक असल्याबाबतची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नितीन फुके यांनी दिली. डॉ. नितीन फुके यांनी सन २००६ मध्ये गवळावू गाईवर संशोधन केले आहे. देशी गाईचे दूध सुद्धा अत्यंत पौष्टिक असून भविष्यात गवळावू व देशी गाईचे जतन करणे महत्त्वाचे असल्याने त्या जातीची शेतकऱ्यांना ओळख होण्याकरीता पशुसंवर्धन विभागाच्या डॉ. सतीश राजू व डॉ. नितीन फुके यांनी या महोत्सवात पशु प्रदर्शन भरविले आहे.
विदर्भाचा गौरव ठरताहे ‘गवळावू गाय’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 9:51 PM
वैनगंगा कृषी महोत्सवात विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यात शेतकऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे ते भंडारा पशुसंवर्धन विभागाचा भारतातील महत्त्वाच्या दूध उत्पादन देणाऱ्या देशी गाईचा स्टॉल. यातही विदर्भाची गवळावू जातीची गाय व वळू शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करीत आहे.
ठळक मुद्देवैनगंगा कृषी महोत्सव : दूध उत्पादन देणाऱ्या देशी गाईचा स्टॉल शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र