लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील पथसंचालनात साकोली सारख्या शहरातील भुमेश्वरी पुरामकर हिने सहभागी होत महाराष्ट्राचे नेतृत्व केले. राज्यातून निवड झालेल्या सात विद्यार्थीनीत भुमेश्वरीने पथसंचालनात सर्वांचे लक्ष वेधले. दिल्लीवरुन तिचे साकोलीत आगमन होताच महाविद्यालयापर्यंत ढोलताशाच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली.साकोली येथील शामराव बापू कापगते कला महाविद्यालयाची विद्यार्थीनी भुमेश्वरी पुरामकर हिची दिल्लीच्या प्रजासत्ताक परेडसाठी निवड झाली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठातील केवळ दोन विद्यार्थीनींचा यात सहभाग होता. ग्रामीण भागातून निवड झालेली राज्यातील एकमेव विद्यार्थीनी ठरली. दिल्ली येथे राजपथावर पथसंचालन करुन ती सोमवारी साकोलीत दाखल झाली. गावच्या लेकीने दिल्लीपर्यंत आपल्या महाविद्यालयाचा झेंडा फडकाविल्याने तिचे गावकऱ्यांनी तिचे कौतुक केले.तिला या परेडसाठी संस्थेचे अध्यक्ष व न.पा. विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. झेड. शहारे यांनी सहकार्य केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य गणेश पाथोडे यांनी भुमेश्वरीचे स्वागत करुन महाविद्यालयासाठी हा गौरव असल्याचे सांगितले.यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. विजय दरवडे, प्रा. श्रावण कापगते, डॉ. चक्रधर बागडे, डॉ. अरविंद कटरे, प्रा. करुणा गायकवाड, धनेंद्र तुमसरे, भुपेंद्र कापगते, मोहनदास टेंभरे, बाबुलाल उपाध्य, गणेश बोरकर, विनोद वलथरे, कांचन बोरकर, संदीप घोडेश्वर, संजय लांजेवार उपस्थित होते.मान्यवरांसोबत सहभोजनभुमेश्वरी पुरामकर हिने दिल्ली येथे पथसंचालनात भाग घेतल्यानंतर मान्यवरांसोबत सहभोज घेतले. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मानद संसाधन विकास मंत्री, सामाजिक न्यायमंत्री, युवक कल्याण क्रिडा मंत्री यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मंत्रीमंडळातील मान्यवर उपस्थित होते.
दिल्लीच्या राजपथावर चमकली साकोलीची भूमेश्वरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 10:15 PM
दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील पथसंचालनात साकोली सारख्या शहरातील भुमेश्वरी पुरामकर हिने सहभागी होत महाराष्ट्राचे नेतृत्व केले. राज्यातून निवड झालेल्या सात विद्यार्थीनीत भुमेश्वरीने पथसंचालनात सर्वांचे लक्ष वेधले. दिल्लीवरुन तिचे साकोलीत आगमन होताच महाविद्यालयापर्यंत ढोलताशाच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली.
ठळक मुद्देप्रजासत्ताक दिन परेड : शहरात आगमन होताच ढोलताशाच्या गजरात स्वागत